Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

कुंभारमाठ ग्रामपंचायतच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार

कुंभारमाठ ग्रामपंचायतच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार

मालवण | प्रतिनिधी : ग्रामपंचायत कुंभारमाठ यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा, लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा जानकी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.

यावेळी सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती शाम झाड, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, सरपंच पुनम वाटेगांवकर, उपसरपंच जीवन भोगावकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. अक्षता राजन गावडे, पंचायत समिती सदस्या सौ. मानसी प्रमोद भोगावकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद निकम, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर चव्हाण, अनीता गांवकर सोनाली डीचवलकर राहुल परब, आंचल गावठे, प्रिया गोवेकर, सेवानिवृत्त शिक्षिका सौ. कविता खानोलकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कुंभारमाठ गावचा सुपुत्र कु. अमोल चौगुले याची भारतीय सैन्य दलातील आसाम रायफलमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार उपस्थित मान्यवर गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच मालवण पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण यांचा सत्कार सरपंच सौ. पूनम वाटेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. उपसभापती घनशाम झाड यांचा सत्कार उपसरपंच जीवन भोगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ. अक्षता राजन गावडे व पंचायत समिती सदस्या सौ. मानसी प्रमोद भोगावकर यांचाही सत्कार सरपंच सौ. पूनम वाटेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

गटविकास अधिकारी श्याम चव्हाण साहेब यांनी उत्कृष्ट सेवाकार्य करत कुंभारमाठ गावातील आदिवासी कातकरी वस्तीसाठी विशेष प्रयत्न करून २१ कातकरी कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिले. त्यांचाही कुंभारमाठ गावचे माजी सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याचबरोबर ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रमोद निकम यांनी आपल्या कार्यकाळात चांगल्या प्रकारे कामकाज केल्याबद्दल त्यांचाही सत्कार गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मधुकर चव्हाण यांनी सलग १५ वर्षे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष म्हणुन चांगल्याप्रकारे सेवा दिल्याबद्दल ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला. कुंभारमाठ प्राथमिक प्रशालेच्या शिक्षिका सौ.कविता खानोलकर या २८ फेबृवारी रोजी सेवानिवृत्त झाल्या त्यांचाही ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच प्रमोद भोगावकर यांनी केले, तर आभार  उपसरपंच श्री. जीवन भोगावकर यांनी मानले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, महिला बचत गटांचे प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom