Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

मालवण सभापतीपदी सौ. प्रज्ञा चव्हाण तर उपसभापती पदी घनश्याम झाड यांची बिनविरोध निवड

मालवण सभापतीपदी सौ. प्रज्ञा चव्हाण तर उपसभापती पदी घनश्याम झाड यांची बिनविरोध निवड


मालवण पंचायत समितीवर महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

शिवसेना, भाजपा पदाधिकाऱ्यांकडून नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचे अभिनंदन

मालवण : शिवसेना भाजपा महायुतीचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या मालवण पंचायत समिती सभापतीपदी शिवसेना महायुतीच्या सौ. प्रज्ञा भाऊ चव्हाण तर उपसभापती पदी भाजपा महायुतीचे घनश्याम चंद्रकांत झाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.



खासदार नारायण राणे साहेब यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती भक्कम आहे. आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात सभापती, उपसभापती व सर्व सदस्य लोकाभिमुख कारभार करतील. जनतेच्या सेवेसाठी आणि गतिमान विकासासाठी महायुती कटीबद्ध असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.



मालवण पंचायत समिती सभापती उपसभापती पदाची निवड पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार गणेश लव्हे यांच्या उपस्थितीत पार पडली.



यावेळी शिवसेना गटनेते छोटू ठाकूर, सदस्य मानसी भोगावकर, प्रज्ञा दीपक चव्हाण, गणेश तोंडवळकर, रिया बावकर तसेच भाजपचे गटनेते दीपक सुर्वे, सीमा परुळेकर, श्याम झाड, माधुरी मसुरकर, संतोष गावडे, योजना कांबळी आदी सदस्य उपस्थित होते.



महायुती फॉर्मुलानुसार सभापतीपद शिवसेनेकडे तर उपसभापतीपद भाजपाकडे निश्चित झाले. त्यानुसार सभापती पदासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आलेले बंद लखोट्यातील पत्र तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी महायुती पदाधिकारी बैठकीत वाचून दाखवत सभापती पदासाठी असलेले प्रज्ञा चव्हाण यांचे नाव जाहीर केले. तर भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी बंद लखोट्यातून वरिष्ठानकडून आलेले पत्र वाचत उपसभापती पदासाठी शाम झाड यांचे नाव जाहीर केले.



शिवसेना गटनेते छोटू ठाकूर, भाजपा गट नेते दिपक सुर्वे यांच्या सूचक स्वाक्षरीने सभापती, उपसभापती उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दुपारी 3 वाजता पिठासीन अधिकारी तहसीलदार गणेश लव्हे यांनी सभापती, उपसभापती बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांचे अभिनंदन केले.

अभिनंदनाचा वर्षाव

सभापती प्रज्ञा चव्हाण व उपसभापती शाम झाड यांचे शिवसेना भाजपा पदाधिकारी, अधिकारी तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, माजी उपसभापती राजू परुळेकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, जिप सदस्य क्षमा हडकर, संतोष साटविलकर, सुमेधा पाताडे, नगरसेवक मंदार केणी, ललित चव्हाण, महानंदा खानोलकर यांसह महेश मांजरेकर, संतोष गांवकर, विजय निकम, दाजी सावजी, देवेंद्र हडकर, महेश बागवे, नाभिक संघटना जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, विजय चव्हाण, जगु चव्हाण, भाऊ चव्हाण, शाम वाक्कर, बाबू परब, पंकज वर्दम, शिवरामपंत पालव, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड, स्वप्नील गावडे, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, प्रकाश तोंडवळकर, मनोज हडकर, देवानंद लोकेगांवकर, मुन्ना झाड यांसह पदाधिकारी व नातेवाईक मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.


▪️अमित खोत, मालवण

rapan bottom