ग्रामपंचायत आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे जागतिक महिला दिन निमित्त कार्यक्रम
शानू वालावलकर | मालवण :- ग्रामपंचायत आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे जागतिक महिला दिना निमित्त विभागातील नव निर्वाचित जी.प. व प.स.सदस्य यांचा सत्कार सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ.अक्षता राजन गावडे, प.स सदस्य कुंभारमाठ सौ. मानसी प्रमोद भोगावकर, व वायरी भूतनाथ पंचायत समिती सदस्य घनश्याम झाड यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच सौ. रश्मी रवींद्र टेंबुलकर, सौ.रवींद्र चंद्रकांत टेबुलकर, चंद्रकांत घाटगे, अशोक चव्हाण, आरोग्य सेविका सरमळकर, अंगणवाडी सेविका हेमांगी चव्हाण, दिपाली चव्हाण, विलासिनी सुकाळी, बचत गट महिला चव्हाण, पाटील, सांडव तसेच ग्रामस्थ रमेश बांदल, संतोष बुटे, संजय कदम, शैलेश गोवेकर, छोटू सामंत, प्रकाश बांदल, अजित शिंदे, रोजगार सेवक अश्विनी सुकाळी, ग्रा.प. कर्मचारी अवंतिका सांडव, कल्पेश टेबुलकर, हर्षाली टेबुलकर, मनोहर बांदल, दीपक घाडी, वासुदेव घाडी उपस्थित होते.

यावेळी आनंदव्हाळ घाडीवाडी येथील महिलांचे नृत्य व स्वागत गीत,कार्यक्रम संपन्न झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता चौकेकर व माजी उपसभापती मधुकर चव्हाण तसेच विशेष कार्यकारी विशेष सहकार्य प्रदीप सामंत यांचे लाभले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

