Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

अन्यायाविरुद्ध सनदशील मार्गाने दाद मागणे गरजेचे : कणकवली पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे

अन्यायाविरुद्ध सनदशील मार्गाने दाद मागणे गरजेचे : कणकवली पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे

जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय मजदूर संघाचा कणकवलीत महिला मेळावा संपन्न

कणकवली : महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. देशाच्या विकासात महिलांचा मोठा सहभाग आहे. सर्व समाजातील महिलांना संघटीत करून स्वावलंबी बनविण्यासाठी आपण काम केले पाहिजे. स्त्री ही समाजाचा पाया असुन कुटुंब आणि समाज घडविण्यामध्ये महिलांचे योगदान महत्वाचे आहे. जर महिलांवर कोणताही अन्याय होत असेल तर आपणच महिलांनी महिलांच्या मागे उभे राहून अन्यायाविरुद्ध सनदशील मार्गाने दाद मागणे गरजेचे असून यासाठी आम्ही सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय देण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन भारतीय मजदूर संघाच्या महिला मेळाव्यात कणकवली पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यावतीने आज कणकवली येथे उत्कर्षा हॉल येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महिला पोलीस कॉन्स्टेबल कारंडे, मजदूर संघ सहसचिव शुभांगी सावंत, घरेलू कामगार जिल्हाध्यक्षा प्राची परब, पदाधिकारी रीमा हिर्लेकर, वृषाली बागवे, रश्मी येंडे आदी उपस्थित होत्या.

महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास करून त्याचा स्वतःसाठी व समाजातील इतर महिलांसाठी फायदा करून देण्याच्या दृष्टीने काम केले पाहिजे. महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक बचत करून समाजामध्ये स्वतः आणि सोबतच्या महिलांना सक्षमपणे उभे राहून सन्मानपूर्वक स्थान निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कुटुंब हा आपला पाया आहे. त्या माध्यमातूनच संस्कारक्षम भावी पिढी बनविण्यासाठी आपण प्रयत्न करूया असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी केले. यावेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल कारंडे, प्राची परब व बागवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सानिका सावंत यांनी केले तर आभार शुभांगी सावंत यांनी मानले. या मेळाव्यास असंघटीत क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

rapan bottom