मोफत जामीन उपलब्ध करून देत उद्योजक राजन सरमळकर यांचे दातृत्व
पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून रस्त्यासाठी 15 लाख निधी
गादववाडी ग्रामस्थांनी मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तथा आंबा बागायतदार उद्योजक राजन सरमळकर यांनी मोफत जामीन उपलब्ध करून दिल्याने पोयरे गादववाडी येथील अनेक ग्रामस्थांना हक्काची घरे आणि हक्काचा रस्ता मिळाला आहे. या रस्त्यासाठी 15 लाख निधी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे, राजन सरमळकर, पोयरे सरपंच गीता राणे यांचे आभार मानले आहेत.
आबा, काजु बाग व्यवसायाच्या निमित्ताने राजन सरमळकर देवगड तालुक्यातील पोयरे गादववाडी येथे अनेक वर्षे संपर्कात आहेत. येथील अनेक कुटुंबाना हक्काची घरे उभारणीसाठी आवश्यक असलेली जामीन राजन सरमळकर यांनी मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. यात जनार्दन कृष्णा रुपये, अनंत कृष्णा रुपये, लवु गोपाळ रुपये, अंकुश गोपाळ रुपये, लक्ष्मण धोंडू धुरी, दत्तात्रय लक्ष्मण धुरी, सुरेश लक्ष्मण धुरी यांनी घरे उभारली.
सुमारे 100 लोकवस्ती असलेल्या या भागात रस्त्याची ही गैरसोय होती. यासाठीही राजन सरमळकर यांनी पुढाकार घेत 500 मिटर लांबीचा रस्ता मार्ग होण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. ग्रामपंचायत माध्यमातून रस्ता नोंद झाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी 15 लाख निधी रस्त्यासाठी उपलब्ध करून दिला.
या रस्त्यावर डांबरीकरण तसेच पोयरे मशवी गादववाडी ते नरिंग्रे सडावाडी रस्ता डांबरीकरण व्हावा. ही मागणीही लवकरच पुर्ण होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
यावेळी प्रकाश माळकर, कृष्णा धुरी, प्रफुल्ल रुपये, रविंद्र रुपये, लक्ष्मण धुरी, अंकुश रुपये, दिपक रुपये, विजय माळकर, गुरूदास माळकर, सीताकांत रुपये, गोपाळ रुपये, उमेश माळकर आदी व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी पालकमंत्री नितेश राणे तसेच राजन सरमळकर यांचे विशेष आभार मानले आहेत.
राणे साहेबांची शिकवण
जनतेची सेवा हेच आपले पाहिले कर्तव्य असले पाहिजे. ही शिकवण राणे साहेबांची आहे. त्यानुसार येथील कुटुंबाना घरे आणि रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. यात पालकमंत्री नितेश राणे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या माध्यमातून रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला. पुढेही होईल. असे राजन सरमळकर यांनी सांगितले.
▪️अमित खोत, मालवण

