Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

महिला दिनानिमित्त स्व. नेहा कोळंबकर-शंकरदास यांच्या स्मरणार्थ आयोजन

ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांचे आयोजन

विविध गटात हर्षाली वेंगुर्लेकर, ईशा शिरोडकर, श्रेया मांजरेकर, सिद्धी फोपळे, अनुष्का कदम, भारती आचरेकर प्रथम

मालवण : ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने महिला दिनानिमित्त स्व. नेहा कोळंबकर - शंकरदास यांच्या स्मरणार्थ मालवण येथे महिलांसाठी आयोजित ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विविध गटातून हर्षाली वेंगुर्लेकर, ईशा शिरोडकर, श्रेया मांजरेकर, सिद्धी फोपळे, अनुष्का कदम, भारती आचरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

यावर्षी या स्पर्धेचे चौथे वर्ष होते. मालवण शहरातील सागरी महामार्गावर मालवण देऊळवाडा ते कोळंब पूल या दोन किलोमीटर अंतरासाठी सहा गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पहिल्या ४ गटासाठी धावणे व पाचवा आणि सहावा गट (४६ ते ५६ वर्षापुढील ज्येष्ठ महिला) या वयोगटातील महिलांसाठी चालणे व धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. गतविजेत्या अनिता आळवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या स्पर्धेत लहान मुली, युवती, तरुणी तसेच ज्येष्ठ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत दोन किलोमीटरचे अंतर पार केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :- वयोगट १० ते १५ :- १.हर्षाली सत्यवान वेंगुर्लेकर, २.महिमा विशाल मोहिते, ३.इविना सालू वाडकर, ४.लिशा मनोज चव्हाण, ५.गार्गी संदेश पाडगावकर. वयोगट १६ ते २५:- १.ईशा विनायक शिरोडकर, २.श्रेया रमाकांत अटक, ३.ममता आनंद थवी, ४.भाग्यश्री जनार्दन मांजरेकर, ५.नजमुनिसा शेख. वयोगट २६ ते ३५ :- १.श्रेया सागर मांजरेकर, २.आराध्या प्रसाद गवंडी, ३.ऐश्वर्या गणेश प्रभुलकर, ४.वेदिता विशाल आचरेकर, ५.ऋग्वेदा धामापूरकर.

वयोगट ३६ ते ४५ :- १.सिद्धि विनायक फोपळे, २.शर्वरी पाटील, ३.नीलम मयेकर, ४.वैशाली माने, ५. प्रीती चव्हाण. वयोगट ४६ ते ५५ :- १.अनुष्का नागेश कदम, २.साक्षी पार्टे, ३.डॉ. शिल्पा झाट्ये, ४. वैदेही कोळमकर, ५.डॉ. पुष्पा माळी, वयोगट ५६ वर्षावरील:- १. भारती आचरेकर, २.अमृता वेझरे, ३.फॅनी फर्नांडिस, ४.अनिता आळवे, ५.शुभांगी सुकी यांनी यश मिळविले.

बक्षीस वितरण समारंभ नगराध्यक्ष ममता वराडकर, शिक्षिका डॉ. ज्योती तोरसकर, प्रा. सुमेधा नाईक, शिक्षिका सारिका शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रत्येक गटातील प्रथम तीन तसेच इतर दोन उत्तेजनार्थ विजेत्या महिलांना आकर्षक चषक, मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले. यावेळी विजय पांचाळ, राजा शंकरदास, बंटी केरकर, राधा केरकर, वृषाली धुरी, पल्लवी खानोलकर, कविता वेंगुर्लेकर, सुविधा तिनईकर, नगरसेवक ललित चव्हाण, अमेय देसाई, कोमल चव्हाण, पूजा तळाशीलकर, वैशाली शंकरदास, रूपा बिडये, गौरवी पराडकर, अंकुश कातवणकर, राजू बिडये, दीपक ढोलम, अंकित शंकरदास, संदीप पेडणेकर, रेनोल्ड बुतेलो, सहदेव साळगावकर, रुपेश खोबरेकर, साई पारकर, हेमंत रामाडे, अभय कदम, अण्णा माणगावकर, रोहित गरगटे, महेंद्र पारकर, हनु हडकर आदी व इतर उपस्थित होते.

rapan bottom