Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

नुकसानग्रस्त आंबा बागांची पालकमंत्री नितेश राणे यांनी केली पाहाणी

नुकसानग्रस्त आंबा बागांची पालकमंत्री नितेश राणे यांनी केली पाहाणी

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडले असून आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील आंबा बागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा बागांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी शासन कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना मदत मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार आर. जे. पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नारनवरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना मदतीची घोषणा लवकरच करण्यात येईल. बदलत्या हवामानाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे. बारामती येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT) संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन प्रणालीचा वापर करून आंबा शेतीचे व्यवस्थापन करण्याबाबतही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे भविष्यात आंबा बागांचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन होऊन शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यास मदत होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

rapan bottom