ॲड. सिद्धेश तवटे व ॲड. दिव्या म्हाडदळकर यांचा युक्तिवाद ; ॲड. संदेश तायशेटे यांचे मार्गदर्शन
कुडाळ : वीना परवाना बंदूका बाळगल्या प्रकरणी संशयित आरोपित अभिषेक अंकुश घाडी ( रा. हेदूळ तालुका मालवण ) याला सिंधुर्ग ओरोस येथील मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने रु. ५० हजार रकमेचा जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. सिद्धेश तवटे आणि ॲड. दिव्या म्हाडदळकर यांनी काम पाहिले त्यांना ॲड. संदेश तायशेटे यांनी मार्गदर्शन केले.
याबाबत ऍड. संदेश तायशेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अभिषेक अंकुश घाडी ( रा. मु पो हेदुळ, मधलीवाडी, ता. मालवण ) याचे कडून २ बेकायदेशीर अग्नीशस्त्र जप्त करून त्यास दाखल गुन्हयात दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी अटक करण्यात आले होते. आरोपी यांने शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ ,५ ,७ ,२५ ,२५ ( १ )( अ ),२५ (१ अ ),२५ (१ अ अ ),२५ (१ ब ),२७ ,२९ तसेच वन्य जीव संरक्षण कायदा कलम ९ ,३१ ,५१ , महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम ६५ ( इ ), भारतीय न्याय्य संहिता ३ (५ ),४९ प्रमाणे गुन्हा केला. या आरोपा वरुन कुडाळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी याला दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय कुडाळ येथे हजर केले असता त्याला दिनांक २५ ऑगस्ट २०२५ पर्यत न्यायालयीन कोठडीचा आदेश करण्यात आला होता. संशयित आरोपी अभिषेक अंकुश घाडी याचे जामिनावर मुक्तता होण्यासाठी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. मे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी आरोपीची ५० हजार रकमेचा सशर्त जामीनावर मुक्तता केली. संशयित आरोपी याचे वतीने ॲड सिद्धेश तवटे आणि ॲड दिव्या म्हाडदळकर यांनी काम पाहिले त्यांना ॲड. संदेश तायशेटे यांचे मार्गदर्शन लाभले.

