Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

लाडघर-बुरोंडी समुद्रात मत्स्यव्यवसायची एल.ई. डी. नौकेवर कारवाई

लाडघर-बुरोंडी समुद्रात मत्स्यव्यवसायची एल.ई. डी. नौकेवर कारवाई

नौकेवर तांडेलसह 4 खलाशी

रत्नागिरी : समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर रत्नागिरीचे मत्स्य व्यवसाय खाते ऐक्शन मोड वर आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दापोली तालुक्यातील लाडघर-बुरोंडी समुद्रामध्ये सोमवारी मध्यरात्री एल.ई.डी. लाईट वापरणाऱ्या नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. या नौकेवर तांडेलसह 4 खलाशी होते. सदर नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे

दि. 12/3/2025 रोजी रात्री 1.30 च्या सुमारास लाडघर बुरोंडी समोर 17°42'15.9"N 72°56'41.6"E मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्रीम. दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) व श्री. स्वप्निल चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) हे स्थानिक लोकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने गस्त घालत होते. यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली श्री. यासिन अब्दुल गफूर मुकादम, रा. खडप मोहल्ला, रत्नागिरी यांची नौका अब्दुल गफूर -नों. क्र. IND-MH -4-MM-6007 द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात लाडघर-बुरोंडी समोर अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट वापरत असल्याचे निदर्शनास आले. ही बोट विभागाने पकडली. या नौकेवर नौका तांडेलसह 4 खलाशी होते.


सदर नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे आणि त्यावर मासळीचा आढळून आलेली नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त केली आहेत.
सदर कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी सागर कुवेसकर व मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, रत्नागिरी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी श्रीम. दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) व श्री. स्वप्निल चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दाभोळ श्री. प्रशांत येलवे, सागरी सुरक्षा रक्षक श्री. योगेश तोस्कर, श्री. राजन शिंदे, श्री. मंदार साळवी व गस्ती नौका रामभद्रा वरील कर्मचारी श्री. ज्ञानेश्वर अजगोलकर, श्री. विशाल यादव, श्री. शिवकुमार सिंग यांचे सहकार्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.

ruchira top