Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

बागायत येथील मालवण बेळणे मुख्य रस्त्याच्या साईड पट्टीची दुरावस्था

बागायत येथील मालवण बेळणे मुख्य रस्त्याच्या साईड पट्टीची दुरावस्था

बांधकाम विभागाचा दुर्लक्ष

भाऊ भोगले | बागायत : बागायत येथून जाणाऱ्या मालवण बेळणे मुख्य रस्त्यावरील विठ्ठलादेवी पूल ते बागायत बाजारपेठ रस्त्याची साईड पट्टी पूर्णपणे उध्वस्त झालेली आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांचा पूर्णपणे दुर्लक्ष झालेला दिसून येत आहे. आणि यामुळे वाहन चालकांमध्ये तसेच स्थानिक व पादचाऱ्यांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


बागायत बाजारपेठ ते विठ्ठलादेवी पूल येथे तीन महिन्यापूर्वी एका खाजगी ठेकेदाराने रस्त्याची साईड पट्टी खोदून त्यामध्ये केबल टाकलेली आहे मात्र सदर ठेकेदाराने खोदलेला चर योग्य पद्धतीने भरलेला नाही तर पांधरा दिवस रस्त्याच्या अर्ध्या भागात माती तशीच ठेवून दिलेली होती. यामुळे स्थानिकांच्या दुकानामध्ये ,घरांमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य झाले होते यावेळी सा.बा.विभाग मालवण यांच्याशी संपर्क साधला असता सदर अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनी स्वीकारला नाही तर दुसऱ्या अधिकाऱ्यांनी सदर रस्ता आपल्याकडे नाही त्याने तिसऱ्याच अधिकाऱ्याचा संपर्क दिला.


आंगणेवाडी यात्रेचा विचार करता मुंबई तसेच कणकवली,कुडाळ, गोवा महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या विविध भागातून येणाऱ्या भाविक भक्तांची गर्दी सगळ्यात जास्त याच रस्त्याने असते . आणि त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ फारच असते तसेच त्या रस्त्यावर दिवसा तसेच रात्रीही ट्राफिक जाम होण्याचा त्रास दरवर्षीचाच आहे कारण या रस्त्यालाच व्ही.आय. पी.साठीचा रस्ता जोडलेला आहे . त्यामुळे जास्तीत जास्त राजकीय तसेच शासकीय अधिकाऱ्यांची ये जा या रस्त्याने होते. असे असून सुद्धा गेले तीन महिने सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांनी या गोष्टीकडे डोळेझाक केले असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी सदर साईड पट्टीचे काम तात्काळ न केल्यास जत्रेच्या दिवसांमध्ये अपघाताचा धोका उद्भवणार असल्याचे स्पष्ट होते
संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई का करण्यात आली नाही ?असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थ तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री सत्यवान भोगले यांनी उपस्थित केला आहे? सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे श्री भोगले यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या रस्त्याचा दुतर्फा असणाऱ्या घराना तसेच दुकानांना रोजच धुळीचा सामना करावा लागत आहे.या विषयाची तक्रार सन्माननीय जिल्हाधिकारी आणि सन्माननीय पालकमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ruchira top