Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

एसीबी ची माजी आमदार वैभव नाईकांना पुन्हा नोटीस

एसीबी ची माजी आमदार वैभव नाईकांना पुन्हा नोटीस

पत्नी स्नेहा वैभव नाईक यांनाही नोटीस

सिंधुदुर्ग : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडून उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांना जबाब नोंदणीसाठी पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये येत्या ११ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. वैभव नाईक यांच्यासह त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक यांना रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वीही वैभव नाईक यांना नोटीस बाजावून चौकशी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस पाठवली आहे.

या नोटिसीत म्हटले आहे की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आपल्या मालमत्तेच्या अनुषंगाने चौकशी सुरु करण्यात आली आहे. उघड चौकशीच्या अनुषंगाने ५ डिसेंबर २०२२ रोजी ला.प्र.वि. कार्यालय रत्नागिरी येथे आपली पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांचेसह उपस्थित राहिला. परंतू लोकप्रतिनिधी कालावधीतील आपली मालमत्ता, उत्त्पन्न व खर्च याबाबत परिपूर्ण माहिती त्यावेळी उपलब्ध नसल्याने सदर माहिती आपण मागाहून सादर करणार असलेबाबत समक्ष सांगितल्याने तसा त्यावेळी प्राथमिक स्वरुपात आपला जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर चौकशीच्या अनुषंगाने मत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्ममधील माहिती व आवश्यक कागदपत्रांसह अनुक्रमे दि.३ जानेवारी २०२३ रोजी आणि दि. २८ जून २०२३ रोजी उपस्थित रहाणेबाबत आपणास या कार्यालयाकडून कळविण्यात आले होते. मात्र आपण उपस्थित न राहता दिनांक २८ जून २०२३ रोजी आपले अकाउंटंट अमोल केरकर हे उपस्थित राहिले. परंतू त्यांनी आणलेली कागदपत्रे परिपुर्ण नसल्याने ती न देता, काही कालावधी नंतर आपले उपस्थितीत सदरची कादगपत्रे हजर करु असे पत्र त्यांनी या कार्यालयास दिलेले आहे. परंतू त्यानंतर अद्यापपावेतो आपलेकडून कागदपत्रांबाबत पुर्तता झालेली नाही अगर आपण उपस्थित राहिले नाहीत. तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून आपले मालमत्तेच्या सुरु असलेल्या उघड चौकशीचे अनुषंगाने श्री नाईक, त्यांची पत्नी सौ. स्नेहा यांचे तसेच HUF व नाईक स्टोन इंडस्ट्रीज यांचे दिनांक १ जानेवारी २००२ ते २९ सप्टेंबर२०२२ या कालावधीतील उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबतची आवश्यक ती परिपुर्ण माहिती आपणास या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या मत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्ममध्ये भरुन तसेच सदर कालावधीतील आयकर विवरणपत्रे, ऑडीट रिपोर्ट, कॉम्प्युटेशन ऑफ इनकम, शेडयुल बॅलन्सशीट, प्रॉफीट अॅन्ड लॉस अकाऊंट डिटेल्स शेडयुल व त्यासंबधीत कागदपत्रांसह दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय येथे उपस्थित रहावे.

तसेच नोटीस पत्र स्नेहा नाईक यांना पाठविण्यात आले असून चौकशी जबाब नोंदविण्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी उपस्थित रहावे, असे नोटिसीत म्हटले आहे.

ruchira top