भाऊ भोगले | बागायत : मसदे तिठा ते वडाचापाट , गोळवण वरून कट्टा अशा जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मसदे तिठा येथून अंदाजे शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या पुलाला वडाचापाटच्या दिशेने जीव घेणे असे खिंडार पडलेले आहे.हे खिंडार वाहन चालकांच्या लक्षात न येणारे आहे, मात्र सदर खिंडार अंदाजे तीन फूट खोलपर्यंत गेलेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पूल फारच अरुंद आहे ,आणि अशा वेळेस वाहनांना बाजू घेताना सदर खिंडारात गाडीचे चाक गेल्यास फार मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच पायी प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांना शाळेतील विद्यार्थ्यांना नेहमीच कसरत करावी लागत आहे.
हा रस्ता मसुरे ते नेरूर पार असा सा. बा.विभाग मालवणमध्ये येतो मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदर विभागाचा या रस्त्याकडे नेहमीच दुर्लक्ष असतो .या रस्त्याने सर्वात जास्त रहदारी असते. या रस्त्यावरून जास्त प्रमाणात अवजड वाहने प्रवास करत आहेत .सध्या तर मसुरे, देऊळवाडा ,वेरली ,बागायत येथून उसाच्या भरलेल्या गाड्या याच रस्त्याने जात आहेत . काही दिवसांवर आंगणेवाडी यात्रा येऊन ठेपली आहे आणि अशा वेळेस सावंतवाडी कुडाळ वेंगुर्ला येथून मोठ्या प्रमाणात गाड्या याच रस्त्याने ये जा करतात तरी संबंधित खात्याने तात्काळ जीवघेण्या खिंडारावर लक्ष घालावा स्थानिक असे ग्रामस्थ तसेच प्रवाशांचे म्हणणे आहे.

मसदे तिठा ते वडाचापाट जोडणाऱ्या पुलाला पडले जीव घेणे खिंडार - सा.बा .विभागाचा दुर्लक्ष
