भाऊ भोगले | बागायत : श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथे नेहमीच विविध शैक्षणिक कार्यक्रम साजरे केले जातात . त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंदानी मिळून"इंग्लिश डे "साजरा केला
इंग्लिश डे साजरा करण्यामागचा प्रशालेचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये इंग्लिश विषयाची असणारी भीती जावो आणि इंग्लिश विषयाची गोडी यांच्यामध्ये निर्माण होऊन आजच्या आधुनिक जगात इतर लोकांशी संपर्कात येताना इंग्लिश भाषेला कोणताही पर्याय नाही आणि अशा वेळेस विद्यार्थ्यांना ती सहजरित्या वापरता यावी आणि यासाठी प्रशालेच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका सौ. वेदिका दळवी यांनी विद्यार्थ्यांना विविध पोस्टर्स ,तसेच विविध डायलॉग, छोट्या नाटिका ,वेगवेगळी इंग्लिश मधून भाषणे देऊन विद्यार्थ्यांमध्ये इंग्लिश भाषा कशी साधी सोपी आहे हे पटवून दिले त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी इंग्लिश व्याकरण (ग्रामर ) गोष्टी ( स्टोरी ) चित्ररूपात मांडल्या होत्या आणि विविध चार्टस विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरात प्रशालेत आणून त्याचे प्रदर्शन मांडले होते
यामध्ये कु .लतिका सावंत हिने बनवलेला टेन्स चा चार्ट तर कु .चिन्मय पालव व कु.आयेशा देसाई हिने चित्ररुपात मांडलेल्या गोष्टी सर्वांना आकर्षित करत होत्या .जवळपास 35 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी.एच .कुबल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सरावाला पर्याय नाही, सराव केल्यास कोणती गोष्ट अशक्य नाही, इंग्रजी विषय समजण्यासाठी सरावाची आणि ती ऐकण्याची व बोलण्याची फार गरज असल्याचे विद्यार्थ्यांना मुंगीच्या गोष्टीचा आधार देत पटवून दिले .हा
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहशिक्षिका प्रतिभा केळुस्कर तसेच शलाका शिंदे यांनी सहकार्य केले . शिक्षकेतर कर्मचारी संकेत हडकर यांचेही सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .वेदिका दळवी तर आभार प्रदर्शन शाळेची विद्यार्थिनी कु.श्रावनी मांजरेकर हिने केले .

वडाचापाट हायस्कूलमध्ये "इंग्लिश डे"विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात केला साजरा
