आदित्य बटावले | कुडाळ : गोवेरी येथील ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथसंग्रहालया च्यावतीने १९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता तेथीलच वाचनालय सभागृहात जिल्हास्तरीय खुली कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पारितोषिके प्रथम क्रमांक दोन हजार रु., द्वितीय पंधराशे रु., तृतीय एक हजार रु. व उत्तेजनार्थ पाचशे रु. अशी आहेत. तसेच विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी ग्रंथपाल धोंडी गावडे किंवा अध्यक्ष सतीश गावडे, मोबा-९४०४९१६८८८ यांच्याकडे नावनोंदणी करावी. जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथसंग्रहालया च्यावतीने करण्यात आले आहे.

गोवेरीत १९ रोजी कथाकथन स्पर्धा
