स.का.पाटील महाविद्यालयात "मानसिक आरोग्य" विषयावरील चर्चासत्र संपन्न
आदित्य बटावले | मालवण : मालवण येथील स.का.पाटील महाविद्यालय , युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांचे "मानसिक आरोग्य" या विषयावर सकाळी ११ ते २ या वेळेत चर्चा सत्राचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. सुमेधा नाईक मॅडम यांनी करून उपस्थितांना डॉ. रुपेश पाटकर यांची व त्याच्या कार्याची सर्वांना माहिती दिली तसेच युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमेट्स संस्थांबद्दल व कार्याबद्दल माहिती उपस्थितांना दिली.
इकॉमेट्स च्या सदस्या बर्डे मॅडम यांनी डॉ. रुपेश पाटकर यांना चाफा पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. डॉक्टर रुपेश पाटकर यांनी सुरुवात करताना भविष्यात जीवाश्म इंधन संपून साधी जीवन शैलीच आपल्याला सुखकर करू शकते यावर सांगताना त्यांनी चरखा वापरून सूत काढणे हे देखील आपल्याला मानसिक दृष्ट्या खूप काही देऊ शकते असे सांगितले. चरख्यामधून सूत काढण्याचे प्रात्यक्षिक गोरक्ष परब यांनी करून दाखवले व गोरक्ष परब यांनी ३००० मीटर एवढ्या लांबीचा दोरा याच चरख्यातून तयार केला असल्याचे डॉक्टर म्हणाले. मार्गदर्शन करताना डॉ. म्हणाले आहे त्या क्षणात जगण्यासाठी चे कौशल्य तसेच प्रयत्न आपण करायला हवेत त्याचबरोबर सबुरी (Patience ) करण्याचे कौशल्य देखील आत्मसात केले हवे हे सांगताना त्यांनी अनेक मार्गदर्शनपर पुस्तकांची मदतीसाठी नावे सांगितली.
त्याच बरोबर उत्तम पालकत्व, तसेच एखाद्या समस्येला कसे सामोरे जायचे, समस्या ओळखायच्या कशा, प्रेम व आकर्षण या बाबतीतील भिन्नता याबाबत सांगताना सर्वप्रथम आपल्याला आपल्या भावना ओळखता येणे खूप महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. ग्राउंड वर्क करणे, तसेच हसत खेळत मनमिळाऊ व्यक्तिमत्व हे सरांचे वैशिष्ट्य असल्याने यावेळी सुद्धा मजा मस्करीपर उदाहरणांमधून चर्चासत्र बहरत गेले. शेवटी सांगता करून इकोमेटच्या चारुशीला देऊलकर यांनी आभार व्यक्त करत आपले सहकार्य असेच कायम आमच्या पाठीशी असावेत अशी इच्छा व्यक्त केली
डॉ. रुपेश पाटकर यांचे "स्वभावचित्र" हे स्वभावा विषयक मार्गदर्शन करणारे पुस्तक सर्वांनी वाचावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. सुमेधा नाईक मॅडम यांनी केले.

