मिली मिश्रा | दोडामार्ग : झरेबांबर तिठा येथे गेल्या काही दिवसात चार अपघात झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग भाजपा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी स्वखर्चाने झरेबांबर येथील अपघातग्रस्त प्रवर्ण क्षेत्रात स्व:खर्चाने जेसीपीच्या माध्यमातून झाडांची साफसफाई करून आवश्यक त्या ठिकाणी मातीचा भराव टाकून हा अपघातग्रस्त झरेबांबर तिठा येथे दोन्ही बाजूने सुरळीत वाहने दिसतील यासाठी पुढाकार घेऊन सुरळीत मार्ग बनवला आहे. यावेळी झरेबांबर, सरगवे , आयनोडे, पाटये ग्रामस्थांनी राजेंद्र म्हापसेकर यांच्या कार्याचे अभिनंदन करून त्यांनीही या कार्यास हातभार लावला. यावेळी सरगवे गावचे माजी सरपंच अंकुश कविटकर, श्रीधर सावंत, आनंद डावरे, ललित पवार, श्री.गवस यांच्यासह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

झरेबांबर अपघातग्रस्त तिठा येथे राजेंद्र म्हापसेकर यांनी स्वखर्चाने केली डागडुजी
