मिली मिश्रा | दोडामार्ग :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. रामदास रेडकर व महाविद्यालयाचे प्रा. सुभाष सावंत यांनी बाबासाहेब यांच्या कार्याचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. सुभाष सावंत म्हणाले की देशाच्या उभारणीमध्ये बाबासाहेबांचे खूप मोठे योगदान आहे. देशात अनेक जाती, धर्म ,पंथ असल्याने या सर्वांना समाऊन घेणारी सर्वसमावेशक घटना लिहिणे सोपे काम नव्हते. पण बाबासाहेबांनी ते करून दाखवले. महिलांना समान संधी, हक्क, न्याय व मताचा अधिकार दिला. ग्रामीण, गरीब ,शेतकरी ,आदिवासी ,सर्वसामान्य व्यक्ती शेतमजूर यांच्या मतांचा आदर केला. भारताच्या विकासासाठी नदीजोड प्रकल्पाचे महत्त्व सांगितले. आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात न्यायाची भूमिका घेऊन काम केले. छत्रपती शिवाजी महाराज व शाहू ,फुले यांच्या विचारांचा वारसा त्यांनी पुढे चालविला. म्हणून आपला देश अस त्यांच्याच मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून मार्गक्रमण करताना आढळून येतो. त्यानंतर रामदास रेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर पी. डी. गाथाडे यांनी केले तर उपस्थित आमचे आभार डॉ. संजय खडपकर यांनी मानले

