Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

अपघात । सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

अपघात । सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

ग्रामस्थ आक्रमक

मिली मिश्रा | दोडामार्ग : झरेबांबर तिठा,दोडामार्ग येथे रस्ता ओलांडताना भाजी वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोने धडक दिल्यामुळे कु. श्रेया संदीप गवस या मंगेली येथे राहत असलेल्या ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.

भाजी वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोची धडक बसल्यामुळे या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. श्रेया संदीप गवस (रा. मांगेली) असे या चिमुकलीचे नाव आहे. श्रेया ही काल मांगेली येथून जत्रेसाठी आपल्या आईसह मामाकडे आली होती. घरी परतत असताना दुपारी ही दुःखद घटना घडली.

श्रेया हिला उपचारासाठी घटनास्थळावरून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेनंतर घटना स्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून संबंधित टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घ्यावे अशी मागणी जमावाकडून केली जात आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे.

ruchira top