Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

“आमच्यावर आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा!”

“आमच्यावर आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा!”

देवगडच्या मच्छिमारांनी केलेल्या मासे चोरीच्या आरोपांनंतर मालवणातील मच्छिमार आक्रमक.

पारंपारिक मच्छिमारांची मत्स्य विभाग कार्यालयात धडक

मालवण | प्रतिनिधी:-
देवगड येथील मच्छिमारांनी पारंपारिक मच्छिमारांवर मासे चोरीचा आरोप केल्यानंतर आज मालवणातील पारंपारिक मच्छिमारांनी मत्स्य विभाग कार्यालयात धडक देऊन मत्स्य अधिकाऱ्यांना जाब विचारला. आमच्यावर मासे चोरीचा आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत, आरोप करणारेच अनधिकृत पर्ससीन मासेमारीद्वारे आमच्या सागरी हद्दीतील मासळीची लयलूट करत आहेत, अशा अनधिकृत मासेमारीवर मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसल्यास आम्हीच कायदा हातात घेऊ, त्यानंतर होणाऱ्या परिणामांना मत्स्य अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा पारंपारिक मच्छिमारांनी दिला.
मालवण मधील पारंपारिक मच्छिमारांनी मालवण येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयात धडक देत अनधिकृत मासेमारीवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी रामेश्वर मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष जगदीश खराडे यांच्याकडून मच्छिमारांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. तसेच देवगड येथील मच्छिमारांनी पारंपारिक मच्छिमारांवर केलेल्या मासे चोरीच्या आरोपांचे यावेळी पारंपारिक मच्छिमारांनी खंडन करत याबाबतचे व्हिडीओ पुरावे अधिकाऱ्यांसमोर सादर केले.

यावेळी रामेश्वर मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष जगदीश खराडे, श्रमजीवी रापण संघटनेचे सचिव दिलीप घारे, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर, मच्छिमार नेते विकी तोरसकर, मत्स्य व्यावसायिक तथा ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, दिलीप पराडकर, सुजित मोंडकर, हेमंत जोशी व इतर मच्छिमार उपस्थित होते.

आमच्यावर मासे चोरीचे आरोप करणारे मच्छिमार हे प्रत्यक्षात अनधिकृत पर्ससीन मासेमारी करत असून ट्रॉलिंग मासेमारी करत असल्याचा बनाव करत आहेत. हे अनधिकृत मच्छिमार १० ते १२ वाव समुद्रात म्हणजे आम्हा पारंपारिक मच्छिमारांच्या मासेमारी हद्दीत येऊन मासळी ओरबाडून नेत आहेत. आमचेच मासे नेऊन आम्हालाच चोर म्हटले जातेय. आमच्यावर मासे चोरीचा आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत, असे यावेळी पारंपारिक मच्छिमारांनी सांगितले. आम्हाला मासळी न मिळाल्याने आम्ही मेटाकुटीला आलो आहोत. आम्ही मच्छिमार आत्महत्या करून मरणारे नाही, आम्ही मारून मरू, अशा शब्दात यावेळी मच्छिमारांनी आपली भूमिका मांडली.

मत्स्य विभागाकडे गस्तीसाठी साधी सुसज्ज स्पीड बोटही नाही. अनधिकृत मासेमारीवर कारवाई करण्यास मत्स्य विभागाला जमत नसेल तर आम्ही अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौका पकडून देतो, त्यावर मत्स्य विभागाने कारवाई करावी. मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसल्यास आम्ही कायदा हातात घेऊ, त्यानंतर जे काही होईल त्यास मत्स्य अधिकारी जबाबदार असतील, असा रोखठोक इशारा यावेळी पारंपारिक मच्छिमारांनी दिला. यावेळी मत्स्य विकास अधिकारी प्रतीक महाडवाला यांनी अनधिकृत मासेमारीवर कारवाईचे आश्वासन देत पारंपारिक मच्छिमारांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले.

ruchira top