Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

नगरसेविका सौ अन्वेषा आचरेकर मित्रमंडळ आणि आवारवाडी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त २५ ऑक्टोबरला भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धा

नगरसेविका सौ अन्वेषा आचरेकर मित्रमंडळ आणि आवारवाडी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त २५ ऑक्टोबरला भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धा

मालवण : कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त मालवण नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती तथा नगरसेविका सौ अन्वेषा आचरेकर मित्रमंडळ आणि आवारवाडी मित्रमंडळाच्या वतीने रविवार, २५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता दांडी येथील धुरी कंपाउंड, दांडी शाळेनजीक मालवण येथे भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘रंगीबेरंगी वेशभूषेत, साकारू कल्पकता!’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत विविध वयोगटांतील स्पर्धकांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे.

या स्पर्धेचे तीन गट करण्यात आले आहेत. गट अ मध्ये १ ते ६ वर्षे, गट ब मध्ये ७ ते १५ वर्षे, तर गट क मध्ये १६ वर्षांवरील स्पर्धकांचा समावेश असेल.
प्रत्येक गटातील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. गट अ मध्ये प्रथम क्रमांकासाठी २ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १ हजार ५०० रुपये, तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपये आणि उत्तेजनार्थ ५०० रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. गट ब मध्ये अनुक्रमे ३ हजार, २ हजार, १ हजार आणि ५०० रुपये, तर गट क मध्ये अनुक्रमे ४ हजार, ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये पारितोषिके देण्यात येणार आहेत. ही सर्व पारितोषिके अन्वेषा अजित आचरेकर यांच्या सौजन्याने प्रायोजित करण्यात आली आहेत.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना ओळखपत्र बंधनकारक असेल. स्पर्धा रात्री ९ वाजता सुरू होणार असून, निर्धारित वेळेत उपस्थित न राहिलेल्या स्पर्धकांना स्पर्धेतून वगळण्यात येईल. स्पर्धेच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे.
या स्पर्धेसाठी प्रार्थना फर्नांडीस ( मोबाईल नंबर ८४५९१५८३३८), अनिता मालंडकर ( मोबाईल नंबर ९७७३६७६२४९) आणि ईशा गावकर ( मोबाईल नंबर ९७६७०८३११५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

या स्पर्धेला बालचमूंसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आवारवाडी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ruchira top