मालवण | प्रतिनिधी:- अल निनोचे संकट आणि तीव्र पाणीटंचाईचे सावट ओळखून, आनंदव्हाळ गोवेकरवाडीतील जागरूक ग्रामस्थांनी व तरुणांनी जलसंधारणाचा आपला लढा अधिक तीव्र केला आहे. पहिल्या बंधाऱ्याच्या यशस्वी उभारणीनंतर, आज आनंदव्हाळ गोवेकरवाडी येथील ग्रामस्थांनी पुन्हा एकत्र येत कर्लाचाव्हाळ (वेताची व्हाळी) येथे २२ फूट लांब आणि साडेतीन फूट उंचीचा दुसरा बंधारा स्व:खर्चातून व स्व:कष्टाने यशस्वीरीत्या बांधून पूर्ण केला.
आनंदव्हाळ गोवेकरवाडी येथील थोरला व्हाळ येथे काही दिवसापूर्वी ग्रामस्थांनी बंधारा बांधला होता. आनंदव्हाळ गावातील गोवेकरवाडी ही खूप उंचावर व कातळ भागात वसलेली असल्यामुळे पाणी साठवण्याचे कुठलेही स्तोत्र नाही. परंतु संभाव्य पाणी टंचाई संकटात भू गर्भात कुठे तरी पाणी मुरावे हा एकमेव उद्देश ग्रामस्थांनी ठेऊन कुठल्याही शासकीय मदतीची वाट न पाहता आनंदव्हाळ येथून वाहणाऱ्या ओहोळावर दोन बंधारे बांधून राबवलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
या बंधारा उभारणीच्या कामात पोलीस पाटील शदशरथ गोवेकर, अनंत नांदोस्कर, पपी गोवेकर, निलेश गोवेकर, संदीप गोवेकर, राकेश गोवेकर, शैलेश गोवेकर, भाऊ गोवेकर, विरेश नांदोस्कर, मंदार गोवेकर, उमेश गोवेकर, किरण गोवेकर यांनी सहभाग घेतला होता.

आनंदव्हाळ गोवेकरवाडीच्या ग्रामस्थांकडून दुसऱ्या बंधाऱ्याची उभारणी
