Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने आचरा-पारवाडी नदीवर बंधारा उभारणीच्या दृष्टीने पाहाणी..

आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने आचरा-पारवाडी नदीवर बंधारा उभारणीच्या दृष्टीने पाहाणी..

जलसाठा वाढविणे आणि नदीपात्रातील गाळ उपसा करण्याबाबतही सकारात्मक चर्चा

आचरा गावच्या जलसंवर्धनाला मिळणार बळकटी

आचरा :
आचरा गावच्या जलसंवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने पारवाडी नदीवर बंधारा बांधण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आचरा–पारवाडी नदीवर बंधारा उभारण्याच्या दृष्टीने आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांसमवेत नदीपात्राची पाहणी केली. यावेळी जलसाठा वाढविणे आणि नदीपात्रातील गाळ उपसा करण्याबाबतही सकारात्मक चर्चा केली.
दोन दिवसांपूर्वी आचरा गावचे सरपंच आणि ग्रामस्थांनी आ. निलेश राणे यांची भेट घेऊन एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला होता. समुद्राच्या खाऱ्या पाण्याला अडवून गोड्या पाण्याचा साठा वाढवण्यासाठी पारवाडी नदीच्या मुखावर बंधारा घालता येईल. याबाबत मागणी ग्रामस्थांनी केली होती.
या मागणीची तात्काळ दखल घेत आ. निलेश राणे यांनी आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना समवेत प्रत्यक्ष जागेची पाहणी केली.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्तासामंत, तालुकाध्यक्ष विनायक बाईत, आचरासरपंच जेरान फर्नांडिस, विभागीय अध्यक्ष संतोष कोदे, जिल्हापरिषद सदस्या वर्षा सांबारी, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर, उपसरपंच तथा देवस्थान कमिटी सचिव संतोष मिराशी, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले, पंकज आचरेकर, विजय कदम, मकरंद राणे, मोहन वेंगुर्लेकर, अभि लाड यांसह अन्य कार्यकर्ते बहुसंख्य पारवाडी ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहाणी करून, बंधाऱ्याची नेमकी जागा, उंची आणि त्यासाठी येणारा खर्च याचा सविस्तर अंदाज तातडीने सादर केला जाणार आहे.
दरम्यान, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने गाळ काढण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. यासाठी नाम फाउंडेशनला वर्क ऑर्डर देण्यात आली असून लवकरच गाळ उपसा सुरू होईल.
या बंधाऱ्यामुळे अडवले जाणारे गोडे पाणी आचरा परिसरासह तालुक्यातील इतर भागात वापरता येईल का, याचीही तपासणी करण्याचे निर्देश आ. राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या निर्णयामुळे आचरा गावच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची आशा व्यक्त होत आहे.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top