Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

शिल्पा यतीन खोत यांच्या लक्षवेधी सामाजिक पुढाकारातून बंदर जेटीवरील स्वच्छतागृह अस्वच्छता प्रश्न मार्गी..!

शिल्पा यतीन खोत यांच्या लक्षवेधी सामाजिक पुढाकारातून बंदर जेटीवरील स्वच्छतागृह अस्वच्छता प्रश्न मार्गी..!


नगरपरिषद प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही : स्वच्छतागृहातील पाणीपुरवठाही सुरळीत

मालवण | प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकीची जाणीव, नागरिकांच्या समस्यांप्रती संवेदनशीलता आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेण्याची वृत्ती या पद्धतीने सेवाकार्य करणाऱ्या शिल्पा यतीन खोत यांच्या सामाजिक आणि संवेदनशील कार्याचा प्रत्यय मालवण बंदर जेटीवरील स्वच्छतागृहाच्या प्रश्न सोडवणुकीत दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेल्या येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या समस्येकडे शिल्पा खोत यांनी गांभीर्याने लक्ष वेधत प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या पुढाकारानंतर नगरपरिषद प्रशासनाने दखल घेत स्वच्छतागृहाची स्वच्छता केली तसेच पाणीपुरवठाही सुरळीत केला.

मालवणच्या पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या बंदर जेटी परिसरात दररोज पर्यटक, स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र, येथील सार्वजनिक स्वच्छतागृहात गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छता पसरल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. स्वच्छतागृहातील पाण्याचा पुरवठाही सुरळीत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. याचा विशेषतः महिला पर्यटकांच्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक होते. स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी ही बाब शिल्पा खोत यांच्या निदर्शनास आणून दिली.

समस्येची माहिती मिळताच शिल्पा खोत यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले. पाणीपुरवठ्याच्या अडचणीमुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेचा प्रश्न हा नागरिकांच्या आरोग्याशी आणि पर्यटकांच्या मूलभूत सुविधांशी निगडित असल्याने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

बंदर जेटीसारख्या पर्यटनाच्या महत्त्वपूर्ण ठिकाणी स्वच्छतागृहाची दुरवस्था असणे ही बाब गंभीर असल्याचे अधोरेखित करत शिल्पा खोत यांनी मालवण नगरपरिषदेच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. प्रत्यक्ष परिस्थितीची नोंद घेत त्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. पाण्याअभावी स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर त्यावर पर्यायी व्यवस्था करून सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ आणि वापरण्यायोग्य ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या तत्पर पाठपुराव्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली. कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहाची स्वच्छता केली, तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली.

सामाजिक भावनेतून प्रश्न सोडविण्याचा सकारात्मक पुढाकार

सार्वजनिक ठिकाणच्या मूलभूत सुविधांबाबत जागरूक राहून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, हे सामाजिक बांधिलकीचे महत्त्वाचे उदाहरण आहे. शिल्पा खोत यांच्या अनेक कार्यातून ही तत्परता दिसून येते. स्वच्छतेची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शिल्पा खोत यांनी मालवण नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक संजय पवार आणि उपस्थित कर्मचाऱ्यांचे आभार मानले. समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याबद्दल स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. दरम्यान, बंदर जेटीवरील स्वच्छतागृहाची स्वच्छता नियमित राखली जावी, पाणीपुरवठा खंडित होऊ नये आणि पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ruchira top