भजन, डबलबारी क्षेत्रातील सुमधुर आवाज
देवगडच्या नाडणमधील वरची पुजारेवाडीची कर्तृत्ववान लेक!
स्काय न्यूज टुडे | मंगेश नलावडे : प्रत्येक स्त्रीच्या अंतरंगात एक आदिशक्ती वास करते. तिच्या कर्तृत्वात सृजनाची ताकद असते, जिद्दीत अशक्याला शक्य करण्याचे सामर्थ्य असते, तर संघर्षाच्या वाटेवरून मार्गक्रमण करताना तिच्या आत्मविश्वासाला अनुभवांची भक्कम जोड मिळत असते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, संकटांनी कितीही घेरले, तरी मनातील स्वप्नांवर विश्वास ठेवून पुढे जाणारी स्त्री स्वतःचे आयुष्य घडविण्याबरोबरच अनेकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरते. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात अशाच कर्तृत्ववान स्त्रियांच्या संघर्षमय प्रवासाला, त्यांच्या जिद्दीला आणि समाजासाठीच्या योगदानाला मानाचा मुजरा करणारे ‘स्काय न्यूज टुडे’चे विशेष सदर म्हणजे ‘नवदुर्गा : कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दुर्गा!’
या विशेष सदरातून समाजातील विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र मुद्रा उमटविणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाची वाट निर्माण करणाऱ्या आणि नव्या पिढीसमोर आत्मनिर्भरतेचा आदर्श ठेवणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. याच प्रेरणादायी वाटचालीतील एक आश्वासक नाव म्हणजे देवगड-नाडण वरची पुजारेवाडी गावची कु.किर्ती प्रविण पुजारे !
भजन, डबलबारी क्षेत्रात आपल्या सुमधुर गायनाने रसिक श्रोत्यांच्या पसंतीत उतरत आहेत. देवगड नाडण वरची पुजारेवाडी येथील किर्ती प्रविण पुजारे. यांचे प्राथमिक शिक्षण नाडण या गावातच झाले.माध्यमिक शिक्षण अ. कृ.केळकर हायस्कूल वाडा.आणि पुढे १२ वी पर्यंत देवगड कॉलेज.आता यावर्षी १३ वी साठी रत्नागिरी गोगटे जोगळेकर कॉलेज मध्ये त्या संस्कृत विषया साठी शिकत आहे.तिला भजनाची आवड अगदी लहानपणा पासूनच आहे.कारण वडील श्री प्रविण पुजारे हे स्वतः पखवाज विशारद आहेत.त्यामुळे भजनाची आवड अगदी लहानपणा पासून आहे.घरातच सतत भजनाचा गजर होत असल्याने अगदी सातवीत असल्यापासून संगीत भजन सिंगल बारी.स्पर्धा करण्यास सुरुवात केली.सुरुवातीला वडिलां कडून.मग बुवा पखवाज विशारद मारुती मेस्त्री फोंडा आणि आता गेली ५ वर्ष संगीत विशारद बुवा - विश्वास प्रभुदेसाई यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेत आहे.
इयत्ता पहिली पासून लावणी नृत्य सादर करत ते आता पर्यंत. पखवाजच्या ३ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत.अनेक भजन स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम . द्वितीय.तृतीय.उत्तेजनार्थ अशी पारितोषिके मिळाली आहेत.सध्या डबल बारी क्षेत्रात कार्यरत आहे. वडील अपंग असून पखवाज विशारद आहेत. कीर्ती यांच्या कुटुंबात आई, वडील,छोटी बहीण आणि आपण स्वतः असा चार माणसांचे कुटुंब आहे तिची बहीण ही पखवाज शिकत आहे.अभ्यासात शाळेत नेहमी प्रथम क्रमांकाने पास होत आली आहे. 

कीर्ती पुजारे च या क्षेत्रात येण्याचे कारण म्हणजे भजनाच्या माध्यमातून लोकांना त्या परमेश्वराचे महत्व आणि भक्तीचे अगदी सोपे साधन म्हणजे भजन नामस्मरण आहे हे पटवून देणे .संतांचे महत्व समाजप्रबोधन करणे. डबलबारी करताना बोलणे संत वाणी असावी भजन हे भक्तिमय आणि थोड मनोरंजन असव असे सांगत मी आयुष्यभर भजन सेवा जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत राहीन. असे कीर्ती पुजारे सांगतात. कीर्ती पुजारे यांना घरच्यांचा .गुरुजनांची नेहमीच साथ मिळली आहे.तसेच नाडण ची देवता श्री महादेश्वर, श्री गांगेश्वर, श्री पावणाई देवी, सैलानी बाबा देवता यांच्या आशीर्वादाने आपली प्रगती होत आहे श्री माऊली प्रासादिक महिला भजन मंडळ. नाडण बुवा किर्ती प्रविण पुजारे.पखवाज.पखवाज विशारद.श्री प्रविण पुजारे.तबला - शशिकांत सोमले. कोरस - प्राप्ती पुजारे बुवाची आई,आरोही पुजारे बुवाची बहीण.भार्गवी पुजारे.सानिका पुजारे.मानवी तर्फे.मंजिरी तर्फे. श्रेया फाळके.श्रावणी पुजारे.यात भार्गवी आणि आरोही पखवाज शिकतात अहेव. यासाऱ्याच्या साथीने भजन डबलबारी क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत.
संघर्षातून स्वावलंबनाकडे, स्वावलंबनातून सेवेकडे आणि सेवेतून समाजविश्वासाकडे वाटचाल करणाऱ्या कु.किर्ती प्रविण पुजारे या खऱ्या अर्थाने ‘नवदुर्गा’ सदरातील कर्तृत्वाचा गौरव ठरणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.
त्यांच्या आजवरच्या कार्याला आणि भविष्यातील सामाजिक, राजकीय व व्यावसायिक वाटचालीला ‘स्काय न्यूज टुडे’ डिजिटल मीडिया परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
▪️ अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

कु. किर्ती प्रविण पुजारे
