जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
मालवण (प्रतिनिधी) : भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय, मालवण येथील अकरावी कला शाखेची विद्यार्थिनी अक्षया मांजरेकर हिने १९ वर्षांखालील मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे तिची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अक्षया हिने आपल्या कौशल्याच्या जोरावर तालुकास्तरीय स्पर्धेत यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा दुवा जोडला गेला आहे.
अक्षया मांजरेकर हिच्या या यशाबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
▪️अमित खोत | मालवण

