Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मरीन होमगार्डच्या धाडसाने मुंबईच्या पर्यटकाला जीवदान!

मरीन होमगार्डच्या धाडसाने मुंबईच्या पर्यटकाला जीवदान!

आचरा समुद्रात बुडणाऱ्या मुंबईच्या पर्यटकाला वाचविले

मरीन होमगार्ड नितेश गुरव,अनिकेत परब यांच्या प्रसंगावधान व धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक

मालवण | प्रतिनिधी:
समुद्राच्या उसळत्या लाटा, भरतीचा जोर आणि बुडणाऱ्या पर्यटकाचा जीव वाचविण्याची धडपड... अशा थरारक प्रसंगात क्षणाचाही विलंब न करता समुद्रात झेप घेत मरीन होमगार्डच्या दोन जवानांनी दाखविलेल्या धाडसामुळे मुंबईच्या २५ वर्षीय पर्यटकाला जीवदान मिळाले. नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब यांच्या प्रसंगावधानामुळे आचरा समुद्रकिनाऱ्यावर घडू शकणारी मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आचरा येथील नातेवाइकांकडे मुंबईहून आलेले एक कुटुंब मंगळवारी सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी कुटुंबातील मोहम्मद खान हे समुद्रात अंघोळ करण्यासाठी उतरले. मात्र, भरतीची वेळ असल्याने पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते समुद्रात बुडू लागले. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. खान यांना वाचविण्यासाठी नातेवाइकांनी आरडाओरड सुरू केली.

आक्रोश ऐकताच समुद्रात घेतली झेप!
समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या मरीन होमगार्ड नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब यांच्या कानावर मदतीसाठी सुरू असलेला आक्रोश पडताच त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोघांनी समुद्राच्या दिशेने धाव घेतली. भरतीचा जोर आणि उसळणाऱ्या लाटांचा धोका असतानाही त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर मोहम्मद खान यांना सुरक्षितपणे समुद्राबाहेर काढण्यात त्यांना यश आले.
दोन्ही जवानांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे पर्यटकाला वेळीच मदत मिळाली आणि संभाव्य दुर्घटना टळली. संकटाच्या क्षणी कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी दाखविलेल्या धाडसामुळे मरीन होमगार्डच्या सेवाभावी वृत्तीचा प्रत्यय आला.

पोलीस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्यासह तुकाराम पडवळ, मीनाक्षी देसाई, हेमंत पेडणेकर, विशाल वैजलं, दिगंबर घाडीगावकर, मनोज पुजारे, सावंत तसेच ग्रामस्थ राजन गावंकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पर्यटकांनी समुद्रात उतरताना खबरदारी घ्यावी!

समुद्रकिनाऱ्यावर विशेषतः भरतीच्या वेळी पाण्याचा प्रवाह आणि लाटांची तीव्रता यांचा अंदाज बांधणे कठीण असते. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रात उतरताना आवश्यक खबरदारी घ्यावी. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी केले.नितेश गुरव आणि अनिकेत परब यांनी दाखविलेली तत्परता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे एका पर्यटकाचे प्राण वाचले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे आचरा परिसरातून कौतुक होत आहे.
प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर ऑक्सिजन, लाइफ बोट्स द्या! -मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. देवबाग, तारकर्ली, दांडी, चिवला आणि आचरा या समुद्रकिनाऱ्यांना स्वतः भेट देऊन व्हिडिओ व बातम्यांच्या माध्यमातून आमदारांच्या निदर्शनास येथील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणून दिल्या होत्या. या प्रत्येक किनाऱ्यावर लाइफ सेव्हिंग किट्स, ऑक्सिजनची सुविधा आणि आपत्कालीन बचावासाठी लाइफ बोट्स उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः देवबाग आणि तारकर्ली येथे ऑक्सिजनची सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. समुद्रात बुडण्याची दुर्घटना घडल्यास संबंधित पर्यटकाला उपचारासाठी मालवण येथे आणेपर्यंत बराच वेळ लागतो. या विलंबामुळे रुग्णाची प्रकृती अधिक गंभीर होण्यासह त्याच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दुर्घटनास्थळीच तातडीने प्राथमिक उपचार आणि ऑक्सिजनची सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे.

यावेळी घटनास्थळी माजी सरपंच राजन गावकर, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, पोलीस पाटील तन्वी जोशी, जगन्नाथ जोशी, अजय कोयंडे उपस्थित होते.

ruchira top