Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मालवण | अंध दिव्यांग मुलांनी स्पर्शाच्या जाणीवेतून समुद्र अनुभवला...

मालवण | अंध दिव्यांग मुलांनी स्पर्शाच्या जाणीवेतून समुद्र अनुभवला...

"युथ बिट्स फॉर क्लायमेट" संस्थेच्या सदस्यांनी दिली जैवविविधतेची माहिती...

मालवण | प्रतिनिधी:-
मालवणात संगीत कार्यक्रमासाठी दाखल झालेल्या रोटरी क्लब ऑफ लेक सिटी ठाणे यांच्या सारथी दिव्यांग सेंटरच्या अंध दिव्यांग मुलांनी मालवण मधील युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेच्या सदस्यांच्या साथीने वायरी समुद्रकिनारी समुद्राची माहिती घेत आपल्या स्पर्शाच्या जाणीवेतून समुद्र अनुभवला. 
रोटरी क्लब ऑफ लेक सिटी ठाणे अंतर्गत अंध दिव्यांग मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या सारथी दिव्यांग सेंटरचा अंध दिव्यांग मुलांचा ऑर्केस्ट्रा ग्रुप सध्या मालवणात दाखल झाला आहे. या मुलांना समुद्र अनुभवता यावा व सागरी जैव विविधतेची माहिती मिळावी या उद्देशाने वायरी येथील पर्यटन व्यावसायिक प्रशांत जोशी यांनी "युथ बिट्स फॉर क्लायमेट"या संस्थेशी संपर्क साधला. वायरी समुद्र किनाऱ्यावर या मुलांनी युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या सदस्यांच्या साथीने समुद्र अनुभवला.
यावेळी संस्थेच्या दुर्गा ठिगळे यांनी समुद्रातील जैवविविधता, मासे, प्रवाळ, समुद्री वनस्पती, खडकाळ भाग, वाळूचे विविध रंग, मालवणच्या समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ला याविषयी मुलांना माहिती दिली. संस्थेचे सदस्य दर्शन वेंगुर्लेकर व इतर सदस्यांनी किनाऱ्यावरील शंख, शिंपले मुलांच्या हातात देऊन त्याविषयी व समुद्राविषयी माहिती दिली. यावेळी मुलांनी किनाऱ्यावर पायांना स्पर्श करणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या स्पर्शातून समुद्र अनुभवला. काहींनी त्यांचा अनुभव शब्दातून व्यक्त करून दाखवला. 
यावेळी सारथी दिव्यांग सेंटरच्या ऑर्केस्ट्रा ग्रुपच्या व्यवस्थापक सुप्रिया वराडकर, त्यांच्या सहाय्यक प्रिया करंजे, सुहास वराडकर, प्रशांत जोशी, पालक दुर्गा मोहिते, युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या अध्यक्षा मेगल डिसोजा, उपाध्यक्ष स्वाती पारकर, सदस्य दुर्गा ठिगळे, चारुशीला देऊलकर, कमल बांदकर, मनीषा पारकर, राहुल जाधव, भूषण मेतर आदी उपस्थित होते.

ruchira top