आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून ७ लाखांचा निधी
मालवण | प्रतिनिधी : वायरी भुतनाथ येथील महत्त्वाचे धार्मिक व श्रद्धास्थान असलेल्या निशाणकाठी देवस्थान परिसरात सुशोभीकरण आणि कमान उभारणी करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त ७ लाख रुपयांच्या निधीतून ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
या विकासकामासाठी निधी उपलब्ध झाल्याने वायरी भुतनाथ येथील ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत. याठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
निशाणकाठी देवस्थानाला धार्मिक महत्त्व असून, या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना तसेच स्थानिक ग्रामस्थांना परिसरात आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सुशोभीकरण आणि अन्य व्यवस्थेची कामे करण्यात आली आहेत. यामुळे परिसर अधिक सुशोभीत होण्यासह भाविकांच्या सोयीमध्ये भर पडली आहे.
▪️अमित खोत | मालवण

वायरी भुतनाथ येथील निशाणकाठी देवस्थान परिसराचे सुशोभीकरण !
