शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, सरपंच मोहन वेंगुर्लेकर यांचे सहकार्य : ग्रामस्थ, शिक्षक-विध्यार्थी यांसह लोकसहभागातून जलसंधारणाचा आदर्शवत उपक्रम
मालवण | प्रतिनिधी : यावर्षी पावसाची मोठी तूट असल्याने आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता सर्वत्र पाणीबचत व जलसंधारण मोहिमेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर पाणलोस येथे ग्रामस्वच्छता व लोकसहभागातून जलसंधारणाचा आदर्शवत उपक्रम राबवण्यात आला. पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून वनराई बंधाऱ्याची उभारणी वहाळावर करण्यात आली.
जिल्हापरिषद पुर्ण प्राथमिक शाळा मठ-बुद्रुक पाणलोस येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेत शिक्षक विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत ओढ्यातील गाळ, कचरा काढून खोलीकरण केले. तसेच गावातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. पाणी अडवून भूजल पातळी वाढावी यासाठी वनराई बंधाऱ्याची कामे करण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा पाणलोस गावचे उपसरपंच विनायक बाईत यांनी स्वच्छता मोहिमेसाठी जेसीबी उपलब्ध करून देऊन मोलाचे सहकार्य केले. तसेच गावचे सरपंच मोहन वेंगुर्लेकर यांनी सर्व ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार व्यवस्था केली. तसेच उस्फूर्तपणे मोहिमेस सहभाग दर्शवला. ग्राम स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसेच परिसरात वनराई बंधारा उभराणी करण्यात आली. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विध्यार्थी, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने गाव स्वच्छता, ओढा स्वच्छता आणि वनराई बंधारा मोहीम उत्साहात राबविण्यात आली. ग्रा. पं सदस्य लीना बाईत, आशासेविका सौ. आकांक्षा बाईत, निलेश बाईत यांसह अन्य उपस्थित होते.
▪️अमित खोत, मालवण

पाणलोस येथे ग्रामस्वच्छता व बंधारा उभारणी!
