झोन चेअरमन अनुष्का चव्हाण, अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सेवाउपक्रम
मालवण | प्रतिनिधी : सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत विविध सेवाकार्य उपक्रम राबवण्यात आले.
सेवा सप्ताह निमित्त झोन चेअरमन अनुष्का चव्हाण यांनी यांनी भेट दिली. सेवा सप्ताह अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रोहिदास प्रभूगांवकर यांचा सत्कार करण्यात आला. टपाल दिनानिमित्त सर्कुलरचे अनावरण करण्यात आले. तसेच 15 ऑक्टोबर या जागतिक अंध दिनाचे औचित्य साधून एका अल्पश: अंध महिलेचे सन्मान प्रतिनिधिक स्वरूपात करत त्यांना शिधा भेट देण्यात आला. तसेच डोळ्यांचे महत्व स्पष्ट करणारे सर्कुलर झोन चेअरमन अनुष्का चव्हाण यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी झोन चेअरमन अनुष्का चव्हाण (MJF),
लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर (MJF), सेक्रेटरी पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी, जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, स्वप्नाली नेरुरकर, रूपा कांदळगावकर, अंजली आचरेकर, मनीषा गावकर, दीक्षा गावकर, मिताली मोंडकर, नंदिनी गावकर, मीना घुर्ये, फॅनी फर्नाडिस, अन्वेषा आचरेकर, उमेश नेरुरकर, गणेश प्रभुलकर, महेश अंधारी (MJF), लक्ष्मीकांत खोबरेकर ओटवणेकर, शांति पटेल, उदय घाटवळ, रुजरीओ पिंटो (MJF), राजा शंकरदास, उमेश शिरोडकर आदी सदस्य उपस्थित होते.
▪️अमित खोत | मालवण

लायन्स क्लब मालवणच्या सेवा सप्ताहाची सांगता
