Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

राजू बिडये यांची शिवसेना मालवण शहरप्रमुख पदी नियुक्ती

राजू बिडये यांची शिवसेना मालवण शहरप्रमुख पदी नियुक्ती

रोहन आचरेकर यांना युवासेना शहरप्रमुखपदी नियुक्ती

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नियुक्तीपत्र देत दिल्या शुभेच्छा

मालवण | प्रतिनिधी :
शिवसेना मालवण शहरप्रमुख पदी राजेंद्र (राजू) सतीश बिडये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी राजू बिडये यांची निवड जाहीर केली. आमदार निलेश राणे यांनी राजू बिडये यांना शुभेच्छा दिल्या.
आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण येथील निलरत्न निवास्थानी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राजू बिडये यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, मालवण तालुकाप्रमुख मंदार लुडबे,
उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पुनम चव्हाण, समाज कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, कुडाळ मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, सिंधुदुर्ग बॅंक संचालक बाबा परब, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, मोहन वराडकर, शहर सचिव महेश सारंग, युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, युवा सेना विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, जॉन नरोना, नगरसेवक महेश कांदळगावकर, महेश काेयंडे, महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, नगरसेविका मेघा सावंत, नीना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर, अन्वेषा आचरेकर, मार्टिना फर्नांडिस, रश्मी तुळसकर, सुनील खांदारे, कैलास खांदारे, संतोष खांदारे, पपा कामत, केतन जोशी, परेश पाटकर, शेखर गाड, अभय कदम, निकीत वराडकर, भाई मांजरेकर, अखिलेश शिंदे, गणेश परब, मयू पाटकर, आबा शिर्सेकर, शिवाजी केळूसकर, बाळा माने, सुधीर वस्त, उमेश बिरमोळे, विशाल माेडक, राेहीत कवटकर व अन्य पदाधिकारी सहकारी उपस्थित होते.

राजू बिडये यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील मालवण शहर प्रमुख पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

राजू बिडये सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्व
कट्टर राणे समर्थक अशी ओळख असलेले राजू बिडये अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. रक्तदान चळवळ, आरोग्यविषयक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा व सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. वीज वितरण कंपनीतील सेवानिवृत्त अधिकारी कै. दादा बिडये यांचे ते चिरंजीव. सामाजिक कार्याचा अनुभव आणि विविध क्षेत्रांतील जनसंपर्क लक्षात घेऊन त्यांच्यावर पक्षाच्या शहर संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आताही शहर संघटक म्हणून त्यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली. मालवण शहरातील पक्षसंघटना अधिक सक्षम करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि युवकांना पक्षाशी जोडणे, यावर राजू बिडये यांचा भर राहणार आहे. त्यांच्या नियुक्ती नंतर अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.

युवासेना मालवण शहरप्रमुख पदी रोहन आचरेकर
युवासेना मालवण शहरप्रमुख पदी रोहन आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली. रोहन आचरेकर यांनाही आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शुभेच्छा दिल्या. युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहन आचरेकर यांना नियुक्तीपत्र दिले.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top