Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

भजन क्षेत्रातील सुमधुर आवाज..

भजन क्षेत्रातील सुमधुर आवाज..

खानोली गावची सुकन्या कु. आकांक्षा लक्ष्मण खानोलकर


मंगेश नलावडे | स्काय न्युज टुडे : प्रत्येक स्त्रीच्या रूपात असते एक आदिशक्ती, तिच्या कर्तृत्वात असते सृजनाची ताकद, तर तिच्या जिद्दीत असते अशक्याला शक्य करण्याची सामर्थ्यशाली ऊर्जा! नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात सर्वत्र आदिशक्तीच्या नवदुर्गा रूपांचा जागर होत असताना, स्त्रीशक्तीच्या असामान्य कर्तृत्वाला आणि तिच्यातील असीम प्रतिभेला मानाचा मुजरा करण्याचा हा विशेष प्रयत्न… देवीच्या उत्सवाचे औचित्य साधत ‘स्काय न्यूज टुडे’ डिजिटल मीडिया टीमच्या वतीने ‘नवदुर्गा’ या विशेष सदरातून समाजाच्या विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या, संघर्षावर मात करून स्वकर्तृत्वाने यशाची शिखरे गाठणाऱ्या आणि नव्या पिढीसमोर प्रेरणेचा आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. स्त्रीशक्तीच्या या तेजस्वी प्रवासाला समर्पित असलेला हा शब्दसन्मान म्हणजे तिच्या जिद्दीला, आत्मविश्वासाला आणि कर्तृत्वाला केलेला कृतज्ञतापूर्वक प्रणाम!

आज असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाही कि ज्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला नाहीत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, करत आहेत. कोकणची कला भजन क्षेत्रात आपल्या सुमधुर गायनाने खानोली गावची सुकन्या कु. आकांक्षा लक्ष्मण खानोलकर यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.

कोकणची संस्कृती असलेल्या भजन कलेकडे दिवसेंदिवस युवा युवती वर्गाचा वाढता कल दिसून येत आहे. असच आपल्या भजन कलेच्या माध्यमातून समाजात नावलौकिक प्राप्त करत असलेल्या कु. आकांक्षा खानोलकर या श्री सिद्धेश्वर प्रासादिक महिला भजन मंडळ खानोली यांच्या माध्यमातून आपल्या सुमधूर गायन कलेने सर्वांच्या पसंतीत उतरत आहेत. सण 2017 मध्ये या सिद्धेश्वर प्रासादिक महिला भजन मंडळ ची स्थापना करण्यात आली. या मंडळात 12 सदस्य असून सर्व सदस्य या महिला आहेत. म्हणजे भजन गायक हार्मोनियम वादक, पखवाज वादक तसेच कोरस मंडळी हा सर्व साज महिलांचा आहे. सिंधुदुर्गातील संपूर्ण महिला च भजन मंडळ हे एकमेव असल्याचे सांगितले जात आहे.


सिंधुदुर्गातील नामांकित पखवाज वादक कु. भविका खानोलकर ही सिद्धेश्वर प्रासादीक महिला भजन मंडळ खानोली, वेंगुर्ला बुवा आकांशा खानोलकर, यांना त्या भजन मध्ये पखवाज साथ करतात. भाविका या त्यांच्या बहीण असून आपल्या घरातच सूर आणि ताल यांचे धडे घेत असलेल्या आकांक्षा यांनी कमीवेळात आपल्या कलेत उतुंग भरारी घेत आहेत.
गुरुवर्य श्री दिप्तेश मेस्त्री यांच्या जवळ आकांक्षा या हार्मोनियम ज्ञानाचे धडे घेत आहेत. आकांक्षा या उत्कृष्ट भजना सोबत दशावतार नाटकात हार्मोनियम वादन करते. त्यामुळे बहिण दशावतार पखवाज वादक व आकांक्षा या हार्मोनियम वादक म्हणून दशावतार मध्ये पहिल्या महिला संगीत साथ करणाऱ्या आहेत.


आजोबा काका मठकर व काका घनश्याम खानोलकर हे दशावतारात पखवाज वादन करायचे. आकांक्षाचे वडील लक्ष्मण खानोलकर यांचीही इच्छा होती की आपली मुलगी हा वारसा छंद म्हणून जोपासावा. आणि आपल्या वडिलांच्या इच्छे ची पूर्तता या दोन्ही बहिणी मिळून करत आहेत.

आज समाजात आपल्या कुटूंबाची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. बहीण भाविका ने ही यावर्षी पखवाज वादनात श्री. चिंतामणी संगीत विद्यालयातून गुरुवर्य निलेश पेडणेकर यांच्या मार्गदर्शना खाली पखवाज विशारद ही पदवी प्राप्त केली आहे.

आकांक्षा या आपल्या श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळातून गणेशोत्सव , नवरात्रोत्सव, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमात आपल्या भजन कलेने रसिकश्रोत्यांची मने जिंकत आहेत.



सध्या ती कुडाळ येथे फॅशन डिझाईन चा कोर्स करता आहे.
भजन कला ही खूप शिकण्यासारखी आहे. समाजात मिळणार मान सन्मानाने आपण भारावून जातो. युवा युवतीने अश्या क्षेत्रात उतरले पाहिजे. आपल्या कलेला पुढे आणलं पाहिजे. संगीत क्षेत्रातील विविध स्पर्धा मध्ये सहभाग घेतला पाहिजे असेही यावेळी आकांक्षा खानोलकर यांनी सांगितले.

भजन क्षेत्रात स्त्री शक्तीचा ठसा उमटवणाऱ्या आकांक्षा खानोलकर यांना पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा..!


▪️अमित खोत | मालवण

ruchira top