Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सौ. ज्योती प्रसन्ना देसाई : कर्तृत्वाची उंच भरारी!

सौ. ज्योती प्रसन्ना देसाई : कर्तृत्वाची उंच भरारी!

संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व, संवेदनशीलतेतून रुजलेली समाजसेवा आणि समर्पणातून साकारलेली यशोगाथा

▪️मंगेश नलावडे | स्काय न्युज टुडे :
प्रत्येक स्त्रीच्या रूपात असते एक आदिशक्ती, तिच्या कर्तृत्वात असते सृजनाची ताकद, तर तिच्या जिद्दीत असते अशक्याला शक्य करण्याची सामर्थ्यशाली ऊर्जा! नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात सर्वत्र आदिशक्तीच्या नवदुर्गा रूपांचा जागर होत असताना, स्त्रीशक्तीच्या असामान्य कर्तृत्वाला आणि तिच्यातील असीम प्रतिभेला मानाचा मुजरा करण्याचा हा विशेष प्रयत्न… देवीच्या उत्सवाचे औचित्य साधत ‘स्काय न्यूज टुडे’ डिजिटल मीडिया टीमच्या वतीने ‘नवदुर्गा’ या विशेष सदरातून समाजाच्या विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या, संघर्षावर मात करून स्वकर्तृत्वाने यशाची शिखरे गाठणाऱ्या आणि नव्या पिढीसमोर प्रेरणेचा आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. स्त्रीशक्तीच्या या तेजस्वी प्रवासाला समर्पित असलेला हा शब्दसन्मान म्हणजे तिच्या जिद्दीला, आत्मविश्वासाला आणि कर्तृत्वाला केलेला कृतज्ञतापूर्वक प्रणाम!
आजच्या आधुनिक युगात असे एकही क्षेत्र उरलेले नाही, जिथे महिलांनी आपल्या बुद्धिमत्तेची, कौशल्याची आणि कर्तृत्वाची मोहोर उमटवलेली नाही. पारंपरिक चौकटी ओलांडत, आव्हानांना धैर्याने सामोरे जात आणि स्वप्नांना वास्तवात उतरविण्यासाठी अथक परिश्रम घेत महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. याच कर्तृत्ववान स्त्रीशक्तीचे एक आश्वासक आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणजे वेंगुर्ला येथील सौ. ज्योती प्रसन्ना देसाई या होय.

वेंगुर्ला येथील एक कर्तृत्ववान, संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून सौ. ज्योती प्रसन्ना देसाई यांचे नाव आदराने घेतले जाते. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत स्वतःचे आयुष्य घडवताना कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या आणि त्याचबरोबर समाजासाठीही सातत्याने कार्य करणाऱ्या ज्योती देसाई यांची वाटचाल खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.

पदवीधर असलेल्या ज्योती देसाई गेली पंचवीस वर्षे सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कार्यक्षमतेने, प्रामाणिकपणाने आणि सहकाऱ्यांशी जपलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याने त्यांनी संस्थेतील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संघर्षाने शिकवले जगणे

सन २००१ हे त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण वर्ष ठरले. वडिलांचे अचानक निधन झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले. आई या धक्क्याने पूर्णपणे खचल्या होत्या आणि घरात शिक्षण घेणाऱ्या भावंडांची जबाबदारी मोठी बहीण म्हणून ज्योतीताईंवर आली.
या कठीण काळाने त्यांना परिस्थितीशी लढायला आणि जबाबदारी स्वीकारायला शिकवले. सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेने त्यांना या काळात मोलाचा आधार दिला. पितृतुल्य स्वर्गीय डॉन्टस सर, संस्थेचे सीईओ श्री. सुनील राऊळ सर, तसेच श्री. प्रल्हाद तावडे सर, सौ. वैदेही गावडे, श्री. विठ्ठल बिडये, मंगल देसाई, शीतल हळदणकर आणि इतर सहकारी मित्रांनी दिलेला मानसिक आधार त्यांच्या आयुष्याच्या या कठीण पर्वात महत्त्वाचा ठरला.

पतसंस्थेच्या आधारावर त्यांनी आपल्या भावंडांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांचा एक भाऊ सैन्यातून निवृत्त झाला असून, दुसऱ्याने हार्डवेअर केले आहे,त्यांची धाकटी बहीण मुंबईतील एका प्रतिष्ठित कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे, दुसरी बहिण एक उत्तम गृहिणी आहे. भावंडांना सक्षम करण्यामध्ये ज्योतीताईंच्या संघर्षाचा आणि त्यागाचा मोठा वाटा आहे.

कुटुंबाचा आधार – सामाजिक कार्याची ऊर्जा

सन २००५ मध्ये श्री. प्रसन्ना देसाई यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या देसाई कुटुंबाच्या सून म्हणून सासरच्या जबाबदाऱ्यांमध्ये रमल्या. घरात स्त्री व्यक्ती नसल्यामुळे घरची जबाबदारी, नोकरी आणि सामाजिक कार्य यांचा समतोल साधणे ही मोठी कसरत होती. मात्र पती श्री. प्रसन्ना देसाई यांचा खंबीर पाठिंबा आणि मोलाचे सहकार्य त्यांना सतत मिळत राहिले. त्यांची मुलगी वेदा तसेच दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले आणि प्रोत्साहन दिले. या पाठिंब्यामुळेच ज्योतीताईंना आपल्या सामाजिक कार्याचा विस्तार करता आला.
इनरव्हील क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य

इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला मध्ये त्यांचा प्रवेश सौ. वृंदा गवंडळकर यांच्या माध्यमातून झाला. आज त्या या क्लबच्या दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
समाजसेवेची समृद्ध वाटचाल
ज्योती देसाई यांच्या सामाजिक कार्याला अनेक पैलू आहेत. संस्थेच्या माध्यमातून त्या महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. इनरव्हील क्लबच्या माध्यमातून त्यांनी दिव्यांगांसाठी मदत, डायलिसिस रुग्णांना सहाय्य, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यांसारखे विविध उपक्रम राबवले आहेत.
वेंगुर्ल्याच्या पारंपरिक रानभाज्यांचा उपयोग आणि संवर्धन याबाबत जनजागृती व्हावी, स्थानिक परंपरा आणि आरोग्यदायी आहारपद्धती जपल्या जाव्यात यासाठी त्यांनी कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत.
तसेच फिटनेस आणि वेलनेसच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्यही त्या करत आहेत. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश देणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे.

विविध जबाबदाऱ्यांमधून नेतृत्व

सौ. ज्योती देसाई यांची कार्यक्षमता केवळ एका संस्थेपुरती मर्यादित नाही.
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था – शाखा व्यवस्थापक, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला – अध्यक्ष,
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था – संचालक,
सिंधुदुर्ग जिल्हा टुरिस्ट सेवा सहकारी संस्था मर्या., सिंधुदुर्ग – संचालक, लक्ष्मी आधार NGO – संस्थापक अध्यक्ष
अशा विविध जबाबदाऱ्या त्या समर्थपणे सांभाळत आहेत.

देण्यातच खरा आनंद

ज्योती देसाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा त्यांच्या विचारांमध्ये दिसून येतो.
“आपल्याकडे जे असेल ते दुसऱ्याला दिल्याने ते कमी होत नाही, उलट वाढते. समाजात वावरत असताना समाजासाठी जेवढे काही करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न माणसाने सतत करत राहिला पाहिजे. आपण एक दिले तर देव आपल्याला दहापटीने देतो, यावर माझा ठाम विश्वास आहे.”
हा त्यांचा समृद्ध विचार संपूर्ण प्रवासाचे सार सांगतो.

कुटुंबाची जबाबदारी, नोकरीतील कर्तव्य, विविध संस्थांमधील नेतृत्व आणि समाजसेवेची तळमळ यांचा सुंदर समतोल साधत सौ. ज्योती प्रसन्ना देसाई आज अनेकांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. संघर्षातून सामर्थ्य, सामर्थ्यातून कर्तृत्व आणि कर्तृत्वातून समाजसेवा—अशी त्यांची वाटचाल आहे. म्हणूनच “नवदुर्गा” या गौरवासाठी त्यांचे व्यक्तिमत्त्व निश्चितच प्रेरणादायी ठरते.

'स्काय न्युज टुडे' डिजिटल मीडिया च्या माध्यमातून सौ. ज्योती प्रसन्ना देसाई यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

▪️अमित खोत | मालवण

ruchira top