मालवण बंदर जेटी येथे रंगणार भक्तिरसाची अद्भुत संगीत रजनी
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आयोजन
मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा अनुभव देणाऱ्या दोन दिवसीय ‘बीच लोककला महोत्सव’ ची सांगता रविवारी सायंकाळी मालवण बंदर जेटी येथे होणार आहे.

पहिल्या दिवशी दशावतार ही लोककला सादर करण्यात आल्या. तर दुसऱ्या दिवशी इतर विविध लोककला सादर होणार आहेत. मालवण बीचवर भक्तिरसाची अद्भुत संगीत रजनी रंगणार आहे.

भक्ती, संगीत आणि सुरांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी सज्ज व्हा! समुद्राच्या लाटांचा नाद… भक्तिसंगीताचे मधुर सूर…आणि भक्तिरसात न्हाऊन निघणारी एक अविस्मरणीय संध्याकाळ ठरणार आहे.
सर्वांनी आपल्या कुटुंबीयांसह व मित्रपरिवारासह आवर्जून उपस्थित राहून या अद्भुत संगीत सोहळ्याचा आनंद घ्यावा!असे आवाहन महोत्सव समन्वयक दिव्या सावंत यांनी केले आहे.

