Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आमदार निलेश राणे यांचे निर्देश अन् तात्काळ कार्यवाही

आमदार निलेश राणे यांचे निर्देश अन् तात्काळ कार्यवाही

मालवण बंदर जेटी वाहनतळ येथे गेट घालून बंद केलेला पारंपारिक मार्ग स्थानिकांसाठी खुला

स्थानिक जनतेच्या मागणीची दखल घेत आमदार निलेश राणे यांचे बंदर विभागाला निर्देश

बंदर विभागाने तात्काळ कार्यवाही करत स्थानिकांना ये-जा करण्यासाठी मार्गीका केली उपलब्ध

स्थानिक नागरिक, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक यांनी आ. निलेश राणे यांचे मानले आभार


मालवण (प्रतिनिधी) :
मालवण बंदर जेटी परिसरातील वाहनतळ जागेत गेट घालून बंद करण्यात आलेले पारंपारिक मार्ग स्थानिकांना ये-जा करण्यासाठी खुले करावे या मागणीसाठी स्थानिक मत्स्य व्यावसायिक, वाहतूक व्यावसायिक व पर्यटन व्यवसायिकांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. यावेळी आम. निलेश राणे यांनी बंदर जेटी येथे येत स्थानिक जनतेशी चर्चा केली. परिसराची पाहणी करत बंदर जेटीचा पारंपारिक मार्ग स्थानिक वाहतुकीसाठी खुला ठेवावा तसेच या मार्गांवरून वाहतूक करणाऱ्या स्थानिकांना कोणतेही शुल्क आकारू नये, त्यासाठी ठेक्यामध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, असे निर्देश आमदार निलेश राणे राणे यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना देत याची अंमलबजावणी तात्काळ करावी असे सांगितले.

मालवण बंदर जेटी परिसरातील वाहनतळ जागेचा ठेका देण्यात आला आहे. वाहनतळ येणाऱ्या मार्गांवर गेट घालण्यात आल्याने पारंपारिक मार्ग बंद झाले. यामुळे स्थानिक व्यावसायिक व नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक मत्स्य व्यावसायिक, वाहतूक व्यावसायिक व पर्यटन व्यावसायिक यांनी दोन दिवसापूर्वी मालवण बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. दरम्यान व्यवसायिकानी आज मालवण दौऱ्यावर असलेल्या आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले.

यावेळी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा पर्यटन व्यावसायिक सौ. अन्वेषा आचरेकर, मालवण मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष विकी चोपडेकर, मत्स्य व्यावसायिक विली डिसोजा, हॉटेल व्यावसायिक संतोष शिरगांवकर, बाबा मुकादम यांनी आम. राणे यांच्या समोर समस्या मांडल्या. वाहनतळ जागेला लागून असलेले मार्ग हे वाहतूकीचे पारंपारिक मार्ग असून ते गेट लावून बंद करण्यात आले आहेत. यामुळे मत्स्य व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक व व्यापारी यांची गैरसोय होत आहे. हे मार्ग खुले करण्यात यावेत. तसेच बंदर जेटी रस्ता ते वाहनतळ मार्गांवरून वाहतूक करणाऱ्या स्थानिकांना वाहनतळ ठेकेदाराकडून शुल्क आकारले जात आहे. सदर मार्ग पारंपारिक मार्ग असल्याने शुल्क आकारणे अन्यायकारक आहे त्यामुळे हे स्थानिकांकडून शुल्क घेणे बंद करावे अशा मागण्या यावेळी आम. राणे यांच्याकडे करण्यात आल्या.

यावेळी व्यावसायिकांचे म्हणणे जाणून घेतल्यावर आम. राणे यांनी बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. बंदर जेटीचा मार्ग हा वर्षानुवर्षे वापरात असून तो मार्ग बंद करता येणार नाही, संपूर्ण बंदर जेटी परिसर तुम्ही कसा काय वाहनतळ ठेक्यात घेता, स्थानिक मच्छिमार, मत्स्य व्यावसायिक, वाहतूकदार यांना हा मार्ग खुला राहिला पाहिजे, वाहतुकीचा व स्थानिकांचा विचार होणे आवश्यक आहे, स्थानिक वाहतूकदारांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, त्यानुसार वाहनतळ ठेक्यात आवश्यक बदल करावेत, असे यावेळी आम. राणे यांनी बंदर निरीक्षकांना सांगितले. स्थानिकांसाठी मार्ग खुला करण्याचा निर्देश आम. राणे यांनी बंदर निरीक्षकांना दिले.

आम. निलेश राणे यांनी या प्रश्नी लक्ष घालत आवश्यक सूचना बंदर विभागाला दिल्याने स्थानिक व्यवसायिक व नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेविका मेघा सावंत, बाबा परब, मनोज मेथर, हेमंत शिरगांवकर, परेश धुरी, हर्षल बांदेकर, मयु पारकर, रोहन आचरेकर, आदी तसेच मत्स्य व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक व व्यापारी उपस्थित होते. त्यांनी आभार व्यक्त केले.

बंदर विभागाची तात्काळ कार्यवाही

आमदार निलेश राणे यांच्या आदेशानुसार बंदर विभागाने तात्काळ कार्यवाही करत वाहनतळावर स्थानिकांना ये -जा करण्यासाठी मार्गीका उपलब्ध करून दिली आहे. सायंकाळी उशिरा पर्यत ही कार्यवाही करण्यात आली. याबाबत माहिती बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी दिली.

▪️अमित खोत | मालवण 

ruchira top