Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मालवणमध्ये रंगणार ‘बीच लोककला महोत्सव’

मालवणमध्ये रंगणार ‘बीच लोककला महोत्सव’

10 व 11 ऑक्टोबर रोजी मालवण बंदर जेटी येथे आयोजन

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार महोत्सवाचे उदघाटन

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजन

स्थानिक लोककला पथकांचे सादरीकरण; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य

मालवण (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा अनुभव देणारा ‘बीच लोककला महोत्सव’ शनिवार, दि. १० आणि रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मालवण बंदर जेटी वाहनतळ, मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे, या महोत्सवाचे उदघाटन १० रोजी सायंकाळी ५ वा. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या दिवशी दशावतार ही लोककला सादर होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी इतर विविध लोककला सादर होणार आहेत. अशी माहिती महोत्सव कार्यक्रम समन्वयक दिव्या सावंत व प्रणय तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण भरड येथील हॉटेल मालवणी हेरिटेज येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रणय तेली म्हणाले, या महोत्सवात स्थानिक लोककला पथकांचा सहभाग असणार असून, त्यांच्या सादरीकरणातून कोकणच्या लोकसंस्कृतीतील विविध कलाप्रकार आणि परंपरांचे दर्शन घडणार आहे. समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवामुळे स्थानिक लोककलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार असून, नागरिक आणि पर्यटकांना लोककलेचा आनंद घेता येणार आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, नागरिकांनी तसेच पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक लोककलांचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले असल्याचे श्री. तेली यांनी सांगितले.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top