मालवण नगरपरिषद नळपाणी योजना धामापूर येथील विहिरीच्या बाजूला असलेल्या वहाळावर उभारला बंधारा
धामापूर, काळसे ग्रामपंचायतव व मालवण नगरपरिषद नळपाणी योजना विभाग यांचा संयुक्त उपक्रम
मालवण | प्रतिनिधी : यावर्षी पावसाची मोठी तूट असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्र समस्या भेडसावण्याची शक्यता लक्षात घेता धामापूर, काळसे ग्रामपंचायतव व मालवण नगरपरिषद नळपाणी योजना विभाग यांच्या पुढाकारातून लोकसहभागातून बंधारा उभारण्यात आला. धामापूर येथे मालवण नगरपरिषद धामापूर नळपाणी योजना विहिरीच्या बाजूला असलेल्या वहाळावर हा बंधारा बांधण्यात आला.
यावेळी धामापूर सरपंच मानसी महेश परब, ग्रामसेविका पुजा वानोळे, सदस्य स्वप्नील नाईक, महेश परब, पाणीपुरवठा विभागाचे संतोष मराठे, सुशील घाडी, सुभाष कुमठेकर यांसह अन्य सहकारी कर्मचारी, अंगणवाडी मुख्य सेविका सुवर्णा भगत, शितल नाईक, स्वप्नाली राऊळ, दीपाली मेस्त्री, अस्मि परब, अश्विनी धामापूरकर, तेजस्विनी धामापूरकर यांसह ग्रामस्थ तसेच काळसे ग्रामपंचायत सरपंच, उपासरपंच, सदस्य व कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.
पाणी अडवा पाणी जिरवा यां संकल्पनेतून मोठया प्रमाणात बंधारे उभारणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर धामापूर, काळसे ग्रामपंचायतव व मालवण नगरपरिषद नळपाणी योजना विभाग यांच्या पुढाकारातून लोकसहभागातून ही बंधारा उभारणी करण्यात आली.
▪️अमित खोत, मालवण

धामापूर येथे बंधारा उभारणी!
