Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

३७ वर्षांच्या कर्तव्यनिष्ठ पोलीस सेवेचा सन्मान!

३७ वर्षांच्या कर्तव्यनिष्ठ पोलीस सेवेचा सन्मान!

सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक नारायण दत्ताराम राणे यांचा तळगाव गुणगौरव समितीतर्फे गौरव ; सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे ट्रस्टी गोपाळ दळवी यांची प्रमुख उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी :
महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल ३७ वर्षे प्रदीर्घ व इमानेइतबारे सेवा बजावून पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले मालवण तालुक्यातील तळगाव (शेळवणे वाडी) येथील श्री. नारायण दत्ताराम राणे यांचा तळगाव गुणगौरव समितीच्या वतीने सत्कार करून त्यांच्या प्रदीर्घ पोलीस सेवेचा गौरव करण्यात आला.
तळगाव गुणगौरव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. राणे यांच्या लोअर परेल येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे ट्रस्टी श्री. गोपाळ रघुनाथ दळवी उपस्थित होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना श्री. नारायण राणे यांनी ३७ वर्षांच्या पोलीस सेवेला उजाळा दिला. राष्ट्रपती पदक विजेते वडील कै. श्री. दत्ताराम राणे यांना अभिमान वाटेल अशी प्रतिमा जपण्याचा आपण प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. कोविड काळात कर्तव्य बजावताना आलेले अनुभव, कुटुंबाला देता न आलेला वेळ तसेच वडिलांकडून मिळालेली शिकवण याबाबत त्यांनी मनोगत व्यक्त केले.

सौ. मनीषा नारायण राणे यांनीही पोलीस पत्नी म्हणून कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना आलेल्या विविध आव्हानांचा अनुभव सांगितला. कर्तव्यामुळे पतीला कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नसला, तरी समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी केलेल्या कार्याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी तळगाव हितवर्धक संघाचे उपाध्यक्ष श्री. सुनील बापू दळवी, तळगाव गुणगौरव समितीचे अध्यक्ष श्री. सुभाष मातवणकर, कार्यवाहक श्री. नितीन सावंत, श्री. अमोल दळवी, समितीचे हितचिंतक श्री. वैभव दळवी, प्रसिद्धी प्रमुख श्री. सचिन राणे तसेच कु. सलोनी राणे उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top