Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

ॲम्बुलन्स चालकांचा विशेष सन्मान

ॲम्बुलन्स चालकांचा विशेष सन्मान


सेवा सप्ताहाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मालवणचा उपक्रम

मालवणातील पाच ॲम्बुलन्स चालकांचा प्रातिनिधिक गौरव


मालवण | प्रतिनिधी : रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्याबरोबरच गंभीर अवस्थेतील रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ॲम्बुलन्स चालकांचा लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. सेवा सप्ताहाचे औचित्य साधून मालवणातील पाच ॲम्बुलन्स चालकांचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.

रुग्णवाहिका चालक हे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या मदतीसाठी धावून जाणारे महत्त्वाचे घटक आहेत. रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास लागणारा प्रत्येक क्षण रुग्णासाठी महत्त्वाचा असताना रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत लायन्स क्लब ऑफ मालवणने हा सन्मान सोहळा आयोजित केला.
यावेळी अवधूत परुळेकर, गणेश कुडाळकर, यश मालवणकर, सदा मयेकर आणि दत्तात्रय मयेकर या पाच ॲम्बुलन्स चालकांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापार्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी लायन्स क्लबच्या सचिव पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी, जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, गणेश प्रभुलकर, बाळू अंधारी, मुकेश बावकर, उमेश शिरोडकर, राजा शंकरदास, रुजारिओ पिंटो, अंजली आचरेकर, रूपा कांदळगांवकर यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते.


▪️अमित खोत, मालवण

ruchira top