Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आंध्र प्रदेशच्या बंदर विकास मॉडेलचा महाराष्ट्रासाठी अभ्यास

आंध्र प्रदेशच्या बंदर विकास मॉडेलचा महाराष्ट्रासाठी अभ्यास


मंत्री नितेश राणे आणि आंध्रचे बंदरे मंत्री बी. सी. जनार्दन रेड्डी यांच्यात बैठक

विजयवाडा : आंध्र प्रदेशच्या सागरी आणि बंदर-केंद्रित विकास परिसंस्थेचा अभ्यास करण्यासाठी सुरू असलेल्या अभ्यास दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेश सरकारचे पायाभूत सुविधा व गुंतवणूक तसेच रस्ते व इमारती व बंदरे विभागाचे मंत्री बी. सी. जनार्दन रेड्डी यांच्यासोबत सविस्तर बैठक घेतली.

या बैठकीत आंध्र प्रदेशातील ग्रीनफिल्ड बंदरांचा विकास, जहाजबांधणी व जहाज दुरुस्ती क्लस्टर्स, आधुनिक मत्स्यबंदरांचा विकास, अंतर्देशीय जलमार्ग, वॉटर मेट्रो, किनारी पर्यटन, बंदरांची कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा तसेच बंदरांच्या माध्यमातून औद्योगिकीकरणाला चालना देण्याच्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
बंदरे, उद्योग, मत्स्यव्यवसाय, लॉजिस्टिक्स, जहाजबांधणी, कनेक्टिव्हिटी आणि किनारी अर्थव्यवस्था यांना एकमेकांशी जोडणाऱ्या एकात्मिक सागरी विकास मॉडेलवर बैठकीत चर्चा झाली. बंदर विकासासोबतच संबंधित उद्योग, रोजगारनिर्मिती, मत्स्यव्यवसाय आणि किनारी भागाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी घेण्यात आली.
महाराष्ट्रातील सागरी परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आंध्र प्रदेशच्या विकास मॉडेलमधील उपयुक्त बाबींचा अभ्यास करण्यावर यावेळी भर देण्यात आला. बंदर विकासासोबत कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक्स, जहाजबांधणी, मत्स्यव्यवसाय आणि किनारी पर्यटन यांची सांगड घालण्याच्या दृष्टीने आंध्र प्रदेशातील अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
यावेळी आंध्र प्रदेश मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रवीण आदित्य, IAS, मुख्य अभियंता श्री. राघव राव, पोर्ट ऑफिसर कॅप्टन धर्मा, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे CEO श्री. प्रदीप पी., मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन प्रवीण खरा, कार्यकारी अभियंता श्री. मनीष मेटकर यांच्यासह दोन्ही राज्यांतील वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

ruchira top