Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आंबेरी येथे ११ ऑक्टोबर रोजी मोफत महाआरोग्य शिबिर

आंबेरी येथे ११ ऑक्टोबर रोजी मोफत महाआरोग्य शिबिर

सेवा संकल्प अभियान औचित्य : भाजपा मालवण तसेच भाजपा तालुका उपाध्यक्ष राजन आंबेरकर यांच्या वतीने आयोजन

मालवण | प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य सेवेच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी मालवण तालुका आणि भाजप मालवण तालुका उपाध्यक्ष राजन आंबेरकर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ११ ऑक्टोबर २०२६ रोजी आंबेरी येथे भव्य 'मोफत महाआरोग्य शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे

हे शिबिर आंबेरी येथे सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत संपन्न होणार आहे. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना एकाच छताखाली विविध आजारांवर मोफत उपचार आणि मोफत औषधोपचार मिळावा यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजप मालवण तालुका उपाध्यक्ष राजन आंबेरकर यांनी दिली आहे.

शिबिरात खालील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा व औषधोपचार मोफत मिळणार आहेत:
• दंतचिकित्सा (Dental): दातांचे आजार, हिरड्यांची सूज व दातांच्या इन्फेक्शनवर विशेष उपचार

• त्वचारोग (Skin): सर्व प्रकारचे त्वचेचे आजार आणि ॲलर्जी तपासणी

• नेत्ररोग: डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन

• स्त्री व बालरोग: महिलांचे आजार, गरोदर मातांची तपासणी आणि लहान मुलांचे आजार व उपचार

• अस्थिरोग: सांधेदुखी, गुडघेदुखी, मान व कंबरदुखी यांवर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

• बालरोग तज्ज्ञ: मोठ्या मुलांची आरोग्य तपासणी व बालरोगांवरील उपचार

• सार्वत्रिक आजार (General): संसर्गजन्य आजार तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन

मोफत औषध वाटप:
या शिबिरात तपासणी केलेल्या सर्व रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असणारी सर्व औषधे जागच्या जागी मोफत दिली जाणार आहेत.

"आपले आरोग्य, आपली जबाबदारी" हा मंत्र घेऊन आयोजित केलेल्या या सुवर्णसंधीचा आंबेरी व परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप मालवण तालुका उपाध्यक्ष श्री. राजन आंबेरकर (मोबाईल क्र. ९४२०३९१६४९) आणि भाजप मालवण तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top