Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबरला नवचंडी याग

श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबरला नवचंडी याग

दोन्ही दिवशी महाप्रसादाचे आयोजन

मालवण | प्रतिनिधी :
घुमडे येथील श्री घुमडाई देवी मंदिरात अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीचे औचित्य साधून सोमवार दि. १२ ऑक्टोबर आणि मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सग्रह नवचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. विजय सुरेश मालप यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सर्वांच्या कल्याणासाठी हा धार्मिक विधी करण्यात येणार आहे.
या दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमास सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन व धार्मिक विधींचा लाभ घ्यावा, तसेच दोन्ही दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पहिला दिवस – १२ ऑक्टोबर

नवचंडी यागाच्या पहिल्या दिवशी प्रायश्चित्त, देवांना नारळ व विडे समर्पण, संकल्प, गणेश पूजन, स्वस्ति पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, आचार्य-ऋत्विक वरण, देवता आवाहन, सप्तशती पाठ वाचन, कुंकूमार्चन, आरती आणि महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

दुसरा दिवस – १३ ऑक्टोबर

दुसऱ्या दिवशी आवाहित देवता पूजन, अग्निस्थापना, नवग्रह देवता स्थापना, नवग्रह होम, सप्तशती पाठ हवन, कुंकूमार्चन, बलिदान, पूर्णाहुती, उत्तरांग कर्म, महानैवेद्य, आरती व प्रार्थना हे विधी पार पडणार आहेत. यानंतर सुहासिनी पूजन व ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शारदीय नवरात्रीच्या पवित्र पर्वात आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देवीच्या चरणी प्रार्थना करावी आणि दोन्ही दिवसांच्या धार्मिक सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्ता सामंत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top