Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मालवण ग्रामीण रुग्णालय येथील एक्स-रे मशीन सेवा पुन्हा सुरु..

मालवण ग्रामीण रुग्णालय येथील एक्स-रे मशीन सेवा पुन्हा सुरु..

नगराध्यक्ष ममता वराडकर यांचा यशस्वी पाठपुरावा : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नवी अत्याधुनिक एक्स-रे मशीन लवकरच उपलब्ध होणार

मालवण | प्रतिनिधी :
मालवण ग्रामीण रुग्णालय येथील एक्स-रे मशीन नादुरुस्त असल्याने काही दिवस बंद असलेली एक्स-रे मशीन सुविधा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या पाठपुराव्यातून पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
दरम्यान, मालवण ग्रामीण रुग्णालय येथे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नवीन अत्याधुनिक एक्स-रे मशीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरु असल्याचे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले.

मालवण ग्रामीण रुग्णालय येथे असलेली एक्स-रे मशीन जीर्ण झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक्स-रे मशीन नादुरुस्त झाल्याने सेवा ठप्प झाली होती. नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे एक्स-रे मशीन सुविधा उपलब्ध करून घेतली आहे.

लवकरच अत्याधुनिक एक्स-रे मशीन रुग्णांच्या सेवेत

मालवण ग्रामीण रुग्णालय येथे एक्स-रे मशीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी या ठिकाणी असलेली जीर्ण एक्स-रे मशीन ची निर्लेखन व अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून नवीन अत्याधुनिक एक्स-रे मशीन रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करून दिली जाणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सर्वच ठिकाणी गतिमान रित्या कामे सुरू आहेत. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या सेवेसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी सांगितले.

ruchira top