Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

लायन्स क्लब मालवणचा आरोग्यदायी उपक्रम

लायन्स क्लब मालवणचा आरोग्यदायी उपक्रम

घरेलू तसेच गरजू कामगारांसाठी मोफत धनुर्वात लसीकरण शिबिर संपन्न

मालवण | प्रतिनिधी : घरेलू तसेच गरजू कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे मोफत धनुर्वात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात घरेलू कामगार तसेच गरजू कामगारांनी सहभाग घेत लसीकरणाचा लाभ घेतला.


कामगार वर्गातील अनेक जण दैनंदिन कामाच्या धावपळीत आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपायांकडे लक्ष देत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ मालवणने सामाजिक बांधिलकी जपत या मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन केले.

धनुर्वातासारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेता या उपक्रमाचा कामगार वर्गाला लाभ देण्यात आला.


या शिबिराच्या आयोजनासाठी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी यांच्यासह जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, महेश अंधारी, गणेश प्रभुलकर, उमेश शिरोडकर यांनी सहभाग घेतला. ग्रामीण रुग्णालय, मालवण येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनीही शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केले.

लायन्स क्लब च्या माध्यमातून नेहमीच जनहिताचे उपक्रम राबवले जातात. सामाजिक गरजू घटकांसाठी आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रतिबंधात्मक आरोग्याची जनजागृती करण्याच्या दृष्टीने लायन्स क्लब ऑफ मालवणच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top