मालवण | प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत देवली ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर देवली ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.
‘रक्तदान हेच खरे जीवनदान’ या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देवली परिसरातील ग्रामस्थांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती सरपंच शाम वाक्कर यांनी दिली.

देवली ग्रामपंचायत येथे ६ ऑक्टोबरला रक्तदान शिबिर
