Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कोकण-पश्चिम महाराष्ट्र विभागीय टेबल टेनिस स्पर्धा मालवणात उत्साहात संपन्न

कोकण-पश्चिम महाराष्ट्र विभागीय टेबल टेनिस स्पर्धा मालवणात उत्साहात संपन्न


आठ जिल्ह्यातील २४० खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

निहाली पाटील व प्रियांकुश बोस खुल्या गटाचे विजेते

विविध गटातील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान


मालवण | प्रतिनिधी : महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन, सिंधुदुर्गच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कोकण व पश्चिम महाराष्ट्र विभागीय टेबल टेनिस स्पर्धा २०२६ मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील माघी गणेश मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. २ व ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या या स्पर्धेत कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमधून तब्बल २४० खेळाडू, प्रशिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींनी सहभाग घेतला. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत युवा खेळाडूंनी आपल्या कौशल्याची, चपळाईची आणि जिद्दीची शानदार झलक दाखवली.

महिला खुल्या गटात कोल्हापूरच्या निहाली पाटीलने विजेतेपदावर नाव कोरले, तर पुरुष खुल्या गटात रायगडच्या प्रियांकुश बोसने बाजी मारली. विशेष म्हणजे रायगडच्या दिव्यांग खेळाडू प्रमोद कुमारने आपल्या जिद्दीच्या जोरावर पुरुष खुल्या गटाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारत स्पर्धेतील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

स्पर्धेदरम्यान आमदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनचे अभिनंदन केले. स्पर्धेतील उत्साहपूर्ण वातावरण आणि खेळाडूंचा जोश पाहून आमदार निलेश राणे यांनाही टेबल टेनिस खेळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी खेळाडूंसमवेत टेबल टेनिस खेळाचा आनंद घेतला.

उत्सहात स्पर्धेचे उद्घाटन

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे खजिनदार तथा स्पर्धा अध्यक्ष संजय कडू, विभागीय स्पर्धा आयोजक सचिव हेमंत वालकर, मॅनेजिंग कमिटी सदस्य तथा रत्नागिरी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अजित गाळवणकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विष्णू कोरगावकर, उपाध्यक्ष किरण पिंगुळकर, सहसचिव दीपक जाधव, विलास परुळेकर, दिलीप हुनारी, सतीश पिंगळे, पी. एस. शिंदे, नितीन तळेकर, पंकज पेडणेकर, गुरुनाथ राणे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

आठ जिल्ह्यांतील खेळाडूंचा सहभाग

या विभागीय स्पर्धेत पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या आठ जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. ११, १३, १५, १७ व १९ वर्षांखालील मुले-मुली तसेच महिला खुला आणि पुरुष खुला अशा विविध वयोगटांमध्ये सामने रंगले. एकूण १४ गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत प्रत्येक सामन्यात विजयासाठी खेळाडूंनी अक्षरशः झुंज दिली. उत्कृष्ट फटके, वेगवान सर्व्हिस, आक्रमक रिटर्न आणि बचावात्मक खेळामुळे स्पर्धेतील सामने रंगतदार ठरले.
स्पर्धेतील विजेते व उपविजेते

११ वर्षांखालील मुले : विजेता – रणवीर जाधव (कोल्हापूर), उपविजेता – संयम चव्हाण (कोल्हापूर)
११ वर्षांखालील मुली : विजेती – श्रेया माईन (सातारा), उपविजेती – विभा घाडगे (सातारा)
१३ वर्षांखालील मुले : विजेता – आरव सरदेशमुख (सातारा), उपविजेता – अक्षित ऐनापुरे (सोलापूर)
१३ वर्षांखालील मुली : विजेती – श्रावणी माईन (सातारा), उपविजेती – समृद्धी मनवेलकर (कोल्हापूर)
१५ वर्षांखालील मुले : विजेता – राजवीर साळोखे (कोल्हापूर), उपविजेता – जुनेद मगदूम (कोल्हापूर)
१५ वर्षांखालील मुली : विजेती – गीत जगताप (कोल्हापूर), उपविजेती – श्रावणी माईन (सातारा)
१७ वर्षांखालील मुले : विजेता – वेदांत खालाडे (सोलापूर), उपविजेता – जुनेद मगदूम (कोल्हापूर)
१७ वर्षांखालील मुली : विजेती – गीत जगताप (कोल्हापूर), उपविजेती – वर्षा परुळेकर (सिंधुदुर्ग)
१९ वर्षांखालील मुले : विजेता – वेदांत खालाडे (सोलापूर), उपविजेता – अवधूत चौधरी (सोलापूर)
१९ वर्षांखालील मुली : विजेती – अनन्या जोशी (कोल्हापूर), उपविजेती – निहाली पाटील (कोल्हापूर)
पुरुष खुला गट : विजेता – प्रियांकुश बोस (रायगड), उपविजेता – प्रमोद कुमार (रायगड)
महिला खुला गट : विजेती – निहाली पाटील (कोल्हापूर), उपविजेती – अनन्या जोशी (कोल्हापूर)
विजेत्यांचा रोख पारितोषिके व चषक देऊन गौरव

स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंचा संजय कडू, हेमंत वालकर, विष्णू कोरगावकर, रुजारिओ पिंटो, दिलीप हुनारी, महेश तळवडेकर, किरण पिंगुळकर, मंदार लुडबे आणि नितीन तळेकर यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन गौरव करण्यात आला. रोख पारितोषिके दत्ता सामंत यांनी, तर चषक मंदार ओरसकर यांनी पुरस्कृत केले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी आमदार रवींद्र चव्हाण, दत्ता सामंत, मंदार लुडबे, संजय लुडबे, जयंत गवंडे, जानकी मंगल कार्यालय, प्रांजल होमस्टे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक, जीएसटीपीए महाराष्ट्र, साना होम्स प्रायव्हेट लिमिटेड, चिरंजीव प्रॉडक्ट, कोरगावकर मालवण टेबल टेनिस अकॅडमी, महेश तळवडेकर, रुजारिओ पिंटो आणि डॉ. संजय पाटील यांचे योगदान लाभले.

सर्वांचे मोलाचे योगदान

आयोजनासाठी पदाधिकारी व पंचांचे मोलाचे योगदान स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विलास परुळेकर, चंद्रकांत साळवे, गुरुनाथ राणे, दिलीप हुनारी आणि पंकज पेडणेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्य पंच म्हणून रोहित शिंदे, तंत्रज्ञ म्हणून सतीश पिंगळे, तर पंच म्हणून पराग अंकोलेकर आणि गोपाळ बावसकर यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. डी. जाधव यांनी केले, तर आभार हेमंत वालकर यांनी मानले. मालवणमध्ये प्रथमच मोठ्या व्याप्तीच्या विभागीय टेबल टेनिस स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाल्याने स्थानिक क्रीडाक्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, भविष्यात सिंधुदुर्गातील टेबल टेनिस खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top