स्पर्धेत युवकांनी गांधीजींच्या जीवन कार्यावर सखोल विवेचन केले..
कणकवली :- महात्मा गांधी यांच्या 157 व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रम व अनुभव शिक्षा केंद्र, सिंधुदुर्ग च्या वतीने रविवारी 04 ऑक्टोबर रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेत प्रामुख्याने- 1) गांधीजींच्या पुस्तकातून उलगडणारे जीवन विचार आणि कार्य, 2) जेन- झी च्या नजरेतील गांधी, 3) सद्यस्थितीतील आंदोलनामागील गांधीजींच्या अहिंसावादी सत्याग्रहाची प्रेरणा. हे विषय स्पर्धेकरिता निश्चित करण्यात आले होते. स्पर्धेत युवकांनी गांधीजींच्या जीवन कार्यावर वरील विषयासंदर्भात सखोल विवेचन केले.
या स्पर्धेत-
1) प्रथम क्रमांक- विठ्ठल दळवी
2) द्वितीय क्रमांक - साध्वी चेंदवणकर
3) तृतीय क्रमांक- आर्या जोईल
4) उत्तेजनार्थ - दिशा इस्वलकर
या युवकांनी यश संपादन केले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोपुरी आश्रमाचे खजिनदार विनायक सापळे, सहसचिव संदीप सावंत व गोपुरी वाचन संस्कृतीचा समन्वयक जेन झी- यज्ञेश पोकळे यांनी विशेष मेहनत घेतली. आजच्या या स्पर्धेचे सूत्रसंचालन कुमारी राजनंदिनी चौगुले हिने केले.
या स्पर्धेच्या निमित्ताने युवकांच्यात गांधी विचार जागृत आहेत. जेन-झी गांधी विचार वाचतो आहे व समजूनही घेतो आहे याची प्रामुख्याने चुणुक या स्पर्धेच्या निमित्ताने अनुभवता आली. गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी गांधीजींच्या जीवन कार्याची जेन -झी ला ओळख करून दिली.
या स्पर्धेला गोपुरी आश्रमाचे सचिव विनायक (बाळू) मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे, सहसचिव संदीप सावंत, संचालिका अर्पिता मुंबरकर, व्यवस्थापक सदाशिव (बाबू) राणे, पत्रकार तुषार हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.

महात्मा गांधी यांच्या विचार कार्यावर आधारित वक्तृत्व स्पर्धा संपन्न..
