नगरपालिका व वन विभाग उपस्थितीत समुद्रकिनारी दफन : नगरसेविका अन्वेषा आचरेकर व स्थानिकांचे मदतकार्य
मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील दांडी समुद्रकिनारी रविवारी सकाळी एक डॉल्फिन मृतावस्थेत दिसून आला. किनाऱ्यावर डॉल्फिनचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी तत्काळ नगरपालिका स्वच्छता व आरोग्य विभागाशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
यानंतर नगरपालिका आरोग्य अधिकारी संजय पवार यांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने घटनेची माहिती वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे सुतार तसेच त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली मृत डॉल्फिनच्या शवविच्छेदनाची (PM) प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
त्यानंतर नगरपालिका कर्मचारी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दांडी समुद्रकिनारी नगरपालिकेच्या जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून मृत डॉल्फिन दफन करण्यात आला.
▪️अमित खोत, मालवण

दांडी किनारी मृतावस्थेत आढळला डॉल्फिन
