Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

महान गावात तीन बंधाऱ्यांची उभारणी

महान गावात तीन बंधाऱ्यांची उभारणी


युवा उद्योजक संग्राम साळसकर यांचा पुढाकार; ग्रामस्थांच्या सहभागातून जलसंधारणाला बळ

मालवण | प्रतिनिधी : यंदा अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, महान गावातील युवा उद्योजक संग्राम साळसकर यांनी पुढाकार घेत जलसंधारणाच्या कामाला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली आहे. शासन व प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कच्चे वनराई बंधारे उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात तीन ठिकाणी बंधाऱ्यांची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे.
पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच जलसाठा निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन संग्राम साळसकर यांनी ग्रामस्थांशी समन्वय साधत गावात बंधारे उभारण्याचा उपक्रम सुरू केला. स्वतः पुढाकार घेऊन ग्रामस्थांना या कामासाठी एकत्र आणत त्यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला कृतीचे स्वरूप दिले आहे. पहिल्या टप्प्यात सार्वजनिक विहीर, खालची वाडी येथे बंधारा, गांगेश्वर मंदिराजवळ बंधारा तसेच चराई मंदिर येथील सार्वजनिक विहिरीलगत बंधारा अशा तीन ठिकाणी बंधारे उभारण्यात आले.

या बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. परिणामी भूजल पातळीत वाढ होण्याबरोबरच विहिरींच्या पाणीपातळीलाही फायदा होण्याची अपेक्षा आहे. आगामी काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेष म्हणजे, केवळ बंधारे उभारण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता पुढील काळातही ग्रामस्थांच्या सहभागातून आणखी बंधारे उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
युवा उद्योजक संग्राम साळसकर यांनी दाखविलेल्या या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. सामाजिक बांधिलकी जपत गावाच्या भविष्यातील पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन स्वतःहून पुढाकार घेणे आणि त्यासाठी ग्रामस्थांना सहभागी करून घेणे, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरत आहे. विकासकामे केवळ प्रशासनाच्या माध्यमातूनच नव्हे, तर स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातूनही प्रभावीपणे राबविता येतात, याचे उदाहरण या उपक्रमातून समोर आले आहे.

या श्रमदान उपक्रमावेळी युवा उद्योजक संग्राम साळसकर यांच्यासह सरपंच अक्षय तावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद जाधव, सागर शिंदे, माजी सरपंच सुहास साळुंखे, शामा घाडी, मंगेश साळसकर, पोलीस पाटील संदीप शिंदे, संदीप राणे, सुनील घाडी, विद्याधर नेरकर, तात्या नेरकर, आदित्य घाडी, प्रशांत साळुंखे, गणेश चव्हाण, जयू गावडे, शुभम शिंदे, युवराज नेरकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
महान गावातील हा उपक्रम केवळ तीन बंधाऱ्यांपुरता मर्यादित न राहता, भविष्यात गावाच्या जलसुरक्षेसाठी सामूहिक प्रयत्नांची सुरुवात ठरेल. संग्राम साळसकर यांच्या पुढाकाराला ग्रामस्थांची मिळालेली साथ ही जलसंधारणाच्या लोकसहभागाची सकारात्मक दिशा दाखवणारी ठरत आहे.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top