Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

नांदोस येथे माती बंधाऱ्यांची उभारणी

नांदोस येथे माती बंधाऱ्यांची उभारणी


सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून भाजपचा पुढाकार

मालवण | प्रतिनिधी : संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन आगामी काळात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी नांदोस व अन्य ठिकाणी जलसंधारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे करण्यात येत आहेत. सेवा संकल्प अभियान तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त नांदोस येथील टेंबवाडी तसेच चव्हाणवाडी पश्चिम परिसरात पाणी अडवण्यासाठी माती बंधारे बांधण्यात आले.पालकमंत्री नितेश राणे व प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बंधाऱ्यांची उभारणी करण्यात येत आहे.

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचे पाणी वाहून न जाता ते स्थानिक पातळीवर अडवून त्याचा साठा वाढविणे, भूजल पातळी टिकविणे तसेच शेती व ग्रामस्थांना भविष्यातील पाणीटंचाईपासून दिलासा देणे, या उद्देशाने माती बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक पातळीवर लोकसहभागातून करण्यात येणाऱ्या अशा जलसंधारणाच्या कामांमुळे पावसाचे उपलब्ध पाणी अधिक काळ टिकून राहण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमावेळी भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, महिला तालुकाध्यक्ष समृद्धी आसोलकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, तालुका सरचिटणीस विजय निकम, युवामोर्चा मालवण मंडळ अध्यक्ष सुमित सावंत, बंडू गावडे, सुशील गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top